Tuesday, 20 July 2021

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळित ! "अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले"

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळित !
"अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले"


टिटवाळा, उमेश जाधव : शनिवारी व रविवार पासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून सखल भागात पावसाचे पाणी साचले आहे.


गेली दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण-मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर कांबा सीएनजी पंप पासून ते म्हारळ सोसायटी पर्यंत रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. तसेच या रस्त्यावर खड्डे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्यामुळे या मार्गावर संथ गतीने वहातुक सुरू असल्याने महामार्ग मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. याचा नाहक त्रास वाहन चालक व नागरिकांना सहन करावा लागत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहीला तर या ठिकाणी अधिक बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
तसेच जोरदार कोसळणाऱ्या या पावसामुळे टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील घर आंगण सोसायटी, पटेल मार्ट, डिजीवन लगत गणेश नगर सोसायटी रोड, हरीओम व्हॅली रस्ता आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. या पावसाच्या पाण्यातून नागरिकांना व वाहनचालकांना वाट शोधावी लागत आहे. अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले असल्याने जनजिवन विस्कळित झाले आहे. पावसाचा जोर कायम राहील्यास टिटवाळा शहरी भागातील अनेक सखल भागात पाणी साचले जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment