मोहने येथील गाळेगाव येथे सुरू आहे अवैध दारू विक्री !
*टिटवाळा पोलिसांचे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष*
मोहने, संदीप शेंडगे : मोहने येथील गाळेगाव विभागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू असल्याचा प्रकार महिलांच्या तक्रारीवरून उघडकीस आला आहे.
गाळेगाव येथे स्व. काशिनाथ तरे मार्केट एक्सिस एटीएम च्या मागे दोन ठिकाणी दुकानाच्या गाळ्यामध्ये राजरोसपणे देशी विदेशी मद्य विक्री केली जात आहे.
या अवैध दारूच्या ठिकाणी अनेक बेवड्यांचा दिवस-रात्र वावर सुरू असतो.
अधिकृत दारू विक्रीच्या दरापेक्षा एका दारूच्या बाटली मागे वीस ते पंचवीस रुपये जादा आकारले जातात. अधिकृत दारू विक्रीचे दुकाने बंद झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू घेण्यासाठी बेवडे व नागरिक गर्दी करतात जवळच असलेल्या रहिवाशांना या बेवड्यांचा त्रास होत असून महिलांची या ठिकाणी छेडछाड होत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
शाळेतील विद्यार्थीनी व महिलांना जाण्यासाठी येथून एकमेव रोड असून या ठिकाणी दारू घेणारे बेवडे उभे असतात महाविद्यालयीन विद्यार्थिनी शाळकरी विद्यार्थ्यांनी महिला व सामान्य नागरिकांना यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या या बेकायदेशीर दारू विक्री च्या दुकानावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कल्याण निरीक्षक चव्हाण यांना विचारले असता गाळेगांव तरे मार्केट येथील दोन्ही अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात येतील तसेच नियमाप्रमाणे या दोन्ही दुकानांवर कारवाई केली जाईल असे चव्हाण यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करण्याचे संकेत दिले असले तरी राज्य उत्पादन शुल्क विभाग व टिटवाळा पोलीस ठाणे या अवैध दारूविक्री धंद्यावर कधी कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment