Saturday, 5 February 2022

'अभिनय, हे छोटेसे रोपटे आहे, परंतु काही वर्षानंतर त्याचा वटवृक्ष झालेला दिसेल- अभिनेता मकरंद अनासपुरे !!

'अभिनय, हे छोटेसे रोपटे आहे, परंतु काही वर्षानंतर त्याचा वटवृक्ष झालेला दिसेल- अभिनेता मकरंद अनासपुरे !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याणातील अभिनय नाट्य संस्था ने हे लावलेले छोटेसे रोपटं आहे, परंतु भविष्यात काही वर्षानंतर त्याचा वटवृक्ष झालेला दिसेल आणि त्याचा मी साक्षीदार असेन असे कौतुक महाराष्ट्राचे प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ललित कला केंद्र गुरुकुल आणि अभिनय नाट्य संस्था कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने नाट्य अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रम उद्घाटन प्रंसगी ते बोलत होते.


आपल्या मार्गदर्शन पर भाषणात ते म्हणाले, कोणताही यशाचा शाँटकट नसतो, जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी, असायलाच हवी, यानंतर मिळणारे यश हे दिर्घकाळ असते.


सध्याच्या सोशल मिडियाच्याव्दारे चमकणाऱ्या विषयी बोलताना ते म्हणाले, या मुळे झटपट यशाच्या शिखरावर पोहचतो, पण तितक्याच वेगाने खाली येतो, लोकांनी विसरल्यानंतर असे स्टार डिप्रेशनमध्ये जातात व यातून आत्महत्या होतात, त्यामुळे मेहनत करावी असे सांगून कलाक्षेत्रात जातीपाती नसाव्यात असे त्यांनी सांगितले आणि अभिजित झुंजारराव यांच्या नाट्य संस्थेचे कौतुक केलं.


तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या भाषणात या संस्थेस सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं. तर अभिनय कल्याण चे अभिजित झुंजारराव यांनी सांगितले की, अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, ठाणे, पालघर, धुळे, सिंधूदुर्ग,नाशिक, जयसिंगपूर, आदी ठिकाण्याहून विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आहे. गेली २४ वर्षे आपली संस्था नाट्य महाराष्ट्रात सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने नाट्य विषयक उपक्रम राबवित आहे.

याप्रसंगी जयवंत झुंजारराव, पत्रकार अरविंद म्हात्रे, संजय कांबळे, विलास भोईर, सामाजिक कार्यकर्ते संजय घारे, बालकलाकार, कु. हिंमाशू कांबळे आणि नाट्य संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment