शिवराजे प्रतिष्ठान नागीनदासपाडा ने अपंगांना व्हीलचेअर देऊन केली शिवजयंती साजरी !!
नालासोपारा, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
महाराष्ट्रात विविध ठिकाणी धूम धडाक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्याच प्रमाणे नालासोपारा नागीनदासपाडा येथे शनिवारी शिवराजे प्रतिष्ठान अनोखी शिवजयंती साजरी करताना, छत्रपतींचा वारसा कायम ठेवत रयतेचे दुःख जाणून घेताना परिसरातील अपंग व्यक्तींना व्हीलचेअर वाटप तुलिंज पोलीस ठाणेतील पोलीस निरीक्षक श्री. संतोष सोलणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तर प्रमुख मान्यवर म्हणून शिवसेनेचे श्री. पंकज देशमुख साहेब, माजी नगरसेवक श्री. किशोर पाटील साहेब, श्री. अजितजी खांबे साहेब, वैभाव पालव, निलेश भक्कम, बाळकृष्ण येरापले, प्रकाश बंडबे, ब्रिजेश पेंडा व अन्य मान्यवर उपस्थित होते. तर रात्री कन्यारत्न लेझीम पथकने सर्वांची मने जिंकली. तर संस्कृतीक कार्यक्रमात बाल शाहीर वेदांत मांडवकर याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्य गाथा पोवाडा सादर करताना विभागातील राहिवाश्यांनी यांचे कौतुक केले तर तर रात्री कलाकृती या मंचाने आपले कलाकारांच्या वतीने धमाल करून परिसर दणाणून टाकला. तर या शिवजयंती साठी प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांनी खूप मेहनत घेतली.
प्रत्येकाने आपली जबाबदारी स्वीकारून उत्तम रित्या कार्यक्रम संपन्न केला त्या करिता शिवराजे प्रतिष्ठानचे संस्थापाक श्री. निलेश तेलंगे यांनी सर्व शिलेदार व शिवभक्तांचे आणि विभागातील सर्व नागरिकांचे आभार मानून सदैव तत्पर राहून राज्यांचा इतिहास कायमस्वरूपी तेवत ठेवावा म्हणून सर्वांचे आभार मानले.



No comments:
Post a Comment