Monday, 21 February 2022

चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षाची शिक्षा व ५० लाखाचा दंड, या पूर्वीही झाली आहे शिक्षा !

चारा घोटाळा प्रकरणी लालूप्रसाद यादव यांना ५ वर्षाची शिक्षा व ५० लाखाचा दंड, या पूर्वीही झाली आहे शिक्षा !
   
      
भिवंडी, दिं,21, अरुण पाटील (कोपर) :
             चारा घोटाळा प्रकरणातील पाचव्‍या खटल्यात राष्‍ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आज(२१ फेब्रुवारी )रोजी  रांची येथील सीबीआय न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच त्यांना ६० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.या पूर्वीही चारा घोटाळा प्रकरणी त्यांना  शिक्षा झाली आहे.
             चारा घोटाळ्यातील पाचव्या प्रकरणात विशेष सीबीआय न्‍यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्‍यासह ३८ आरोपींना शिक्षा सुनावली. दोरंदा कोषागारमधून १३९.५ कोटी रुपयांचा अपहार केल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर होता. १५ नोव्‍हेंबर रोजी विशेष सीबीआय न्‍यायालयाने त्‍यांना या प्रकरणी दोषी ठरवले होते.
               चारा घोटाळा प्रकरणातील पाचव्‍या खटल्‍यातील दोषींना आज शिक्षा सुनावण्यात आली. १५ फेब्रुवारी रोजी सीबीआयच्‍या विशेष न्‍यायालयाचे न्‍यायाधीश एस. के. शशी यांनी लालूप्रसाद यादव यांच्‍यासह ४१ जणांना दोषी ठरवले होते.
             या प्रकरणातील ३८ आरोपींपैकी ३५ जण बिरसा मुंडा कारागृहात आहेत. तर लालू प्रसाद यावद, डॉ. के. एम. प्रसाद आणि यशवंत सहाय हे आरोग्‍याच्‍या कारणास्‍तव राजेंद आयुर्विज्ञान संस्‍थेमध्‍ये (रिम्‍स) उपचार घेत आहेत. तर तिघे फरार आहेत.
              चारा घोटाळा प्रकरणी २००१ मध्‍ये १७० आरोपींवर दोषारोपपत्र दाखल झाले. खटल्‍याची सुनावणी सुरु असताना ५५ आरोपींचा मृत्‍यू झाला आहे. तर सात जण माफीचे साक्षीदार झाले होते. तब्‍बल १७ वर्षांपूर्वी म्‍हणजे २००५ मध्‍ये आरोप निश्‍चित केले होते. चारा घोटाळा प्रकरणातील अन्‍य चार खटल्‍यांमध्‍ये लालूप्रसाद यादव यांना १४ वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे.

No comments:

Post a Comment