Sunday, 20 February 2022

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, अंबरनाथ तर्फे शिवजयंती साजरी !!

छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती, अंबरनाथ तर्फे शिवजयंती साजरी !!


अंबरनाथ दि. १९, बातमीदार : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती,अंबरनाथ तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वा जयंती महोत्सव उत्सव हुतात्मा चौक अंबरनाथ (पुर्व ) येथे साजरा करण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समिती चे अध्यक्ष -श्री. विलास आंग्रे सर, कार्यकारी अध्यक्ष -श्री. संजय शिवाजी फुलोरे, उपाध्यक्ष -श्री. रमेश डोंगरे, सचिव -श्री. अमोल वाजे, खजिनदार -श्री. मधुकर महाजन, संघटक -श्री. संदीप बारस्कर, सल्लागार -श्री. बाळकृष्ण परब, वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्री. सुखदेव पाटील साहेब आदिनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजन्म महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले. 


तसेच आमदार श्री. डॉ. बालाजी किणीकर साहेब, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भोगे साहेब, अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कोते साहेब आदी मान्यवर यांनी आवर्जुन भेट दिली.


श्री. संजय शिवाजी फुलोरे, कार्यकारी अध्यक्ष 
छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक महोत्सव समिती, अंबरनाथ.

No comments:

Post a Comment