Sunday, 20 February 2022

महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी देशमुख यांच्या घरी भेट !!

महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अश्विनी देशमुख यांच्या घरी भेट !!


कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हारळ ग्रामपंचायतीच्या उपसंरपच सौ. अश्विनी निलेश देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवसेनेच्या प्रगती प्रकाश कोंगिरे व उपसरपंच पदी अश्विनी निलेश देशमुख यां निवडून आल्यापासून गावात मध्ये विविध सामाजिक, सांस्कृतिक, लोकोपयोगी कार्यक्रम सुरू केले आहेत. त्यातच त्यांचे पती निलेश शिवाजी देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने त्यांचा कार्यास मोठा हातभार लागला आहे.


आज महाराष्ट्र विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष श्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या म्हारळ येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली, अध्यक्ष झिरवाळ साहेब, यांनी अनेक विषय मोलाचे मार्गदर्शन केले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख यांनी म्हारळ गावाच्या विविध अडचणी व समस्या मांडल्या, मोठ्या लोकसंख्ये पुढे काही बाबतीत ग्रामपंचायतीच्या सोईसुविधा कमी पडतात असे निदर्शनास आणून दिले. यावेळी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हारळ गावासाठी सर्वोतोपरी सहकारी करण्याचे आश्वासन दिलं.


तर ठाणे जिल्ह्यातील एखाद्या गावात विधानसभा अध्यक्ष येण्याची म्हारळ गावातील पहिलीच घटना असून या संधीचा गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख यांनी सांगितले.


या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश चौधरी, किशोर वाडेकर, वेदिका गंभीरराव, माझी जिप सदस्य अंजू वाडेकर, मनसे उपतालुका प्रमुख विवेक गंभीरराव, प्रभाकर देशमुख, राजन चव्हाण, किरन सुर्यराव, अतुल देशमुख, राजेश देशमुख, रुपेश देशमुख, रानू देशमुख, प्रमोद देशमुख, नरेश म्हस्के, सुरेश देशमुख, सुरेश देशमुख, नरेश सांबरे, नितेश देशमुख, प्रतीक देशमुख, नितेश शिंदे, अशफाक शेख, सनी वाडेकर, आदी मंडळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment