Thursday, 21 April 2022

शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाईतही' भ्रष्टाचाराचा पूर, शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान, जबाबदार कोण ?

शहापूर तालुक्यात तीव्र पाणी टंचाईतही' भ्रष्टाचाराचा पूर, शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसान, जबाबदार कोण ?


कल्याण, (संजय कांबळे) धरणांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे, लोकांना प्यायला पाणी मिळत नसलेतरी पाणी पुरवठा अधिका-यासाठी मात्र अक्षरशः भ्रष्टाचाराचा पूर आला असून एका तत्कालीन निंलबित अधिका-याकडेच या विभागाचा पदभार असल्याने, आता 'कुंपनच शेत खाणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मात्र एका सामाजिक कार्यकत्याने या विरोधात वरीष्ठ अधिका-याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचे नुकसानीस जबाबदार कोण? त्यांचेवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका हा धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो, परंतु भ्रष्ट कारभार व त्यांना मिळणारी साथ यामुळे 'धरण उशाला व कोरड घशाला, अशी येथील स्थिती आहे. तालुक्यात ५ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहेत. शेद्रूण, कळंबे, खर्डी, बिरवाडी व अगई, या त्या योजना आहेत, हजारो बोअरवेल आहेत. दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार करून त्यामध्ये लाखोंची तरतूद केली जाते. तरीही तालुक्यातील टंचाई काय दूर होत नाही, तालुका टँकर मुक्त होत नाही.


१ सप्टेंबर २०२ १रोजी येथील पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता म्हणून विकास जाधव यांची नियुक्ती झाली. परंतु त्यांच्या नियुक्ती सह त्यांचा सध्याचा कार्यकाळ खूपच वादग्रस्त व भ्रष्ट म्हणून ओळखला जातो. ते अगोदर येथेच शाखा अभियंता म्हणून कार्यरत होते, नंतर वरीष्ठाच्या मेहरबानी मुळे ते उप अभियंता म्हणून रायगड जिल्ह्यातील 'माणगाव' येथे गेले परंतु तेथेही 'करामती, केल्याने ते निंलबित झाले, पुन्हा नाशिक व्हाया शहापूर असा प्रवास करत ते शहापूरात दाखल झाले.


जलजीवन मिशन, ग्रामीण पेयजल, जिल्हा स्तरावर, पंचायत समिती स्तरावर, तसेच टंचाई कृती आराखडा मध्ये सुचविण्यात आलेली कामे प्रस्तावित, अंदाजपत्रस्तर, निविदा स्तर, ठक्कर बापा कामे अशी विविध कामे जिल्हाधिकारी यांनी मजूंरी व परवानगी दिली. यातील बहुतांश कामे ही ३१ मे व ३० जून २०२१ पर्यंत करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु ती केली गेली नाहीत, त्यामुळे ती रद्द करायला हवी होती, किंवा त्यावर दंड आकारायला हवा होता, पण तसे न करता जाधव यांनी त्या कामाची 'देयके, आता काढून त्यावर आता सह्या करून  मपाठविण्यात आली, विलंब आकार न आकारण्यात आल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परिणामी कामे वेळेवर न झाल्याने जनतेला पाणी टंचाई चा 'सामना, करावा लागत आहे


शेद्रूण येथे दिड महिन्यापासून पाणी नाही असे येथील रविंद्र घनघाव व प्रकाश पाटील यांनी सांगितले, शेरे येथील अनियमित पाणीपुरवठयांच्या विरोधात येथील महिलांनी शहापूर पंचायत समितीवर मोर्चा काढला होता, आता ते उपोषणाच्या तयारीत आहेत, अशीच परिस्थिती तालुक्यातील बहुतांश गावात व वाड्या पाड्यावर दिसून येत आहे. याहूनही आश्चर्य म्हणजे ज्या ज्या ठिकाणी टंचाई तून कामे केली आहेत, तेथेच टँकरने कसा काय पाणीपुरवठा केला जातो? याचा अर्थ ही कामे निकृष्ठ झाली आहेत असा होत नाही का? आतापर्यंत टँकरवर २ ते अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे

असा खर्च ; दरवर्षी लाखो करोडोचा होतो, तो मग नेमका कशावर होतो व कुठे होतो, कोणत्या पाण्यात तो मुरतो?हे पाहणे कोणाची जबाबदारी आहे, लोकप्रतिनिधी काय करतात? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते किशोर पंडित यांनी उपस्थित केला आहे.

आज ग्रामसेवकांपासून ते पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी जाधव यांना वैतागले आहेत, अनेकांनी गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्या कडे ही खदखदत बोलूनही दाखवली आहे. त्यांनी ही याला दुजोरा दिला आहे.

कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, डेप्युटी सीईओ, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे, आदी वरीष्ठ अधिक व लोकप्रतिनिधी  या भागाचा पाणी टंचाई दौरा करतात, त्यावर उपाय योजना सुचवितात तर दुसरीकडे अश्या काही भ्रष्ट अधिका-यामुळेच तालुक्यातील पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढतच आहे हे वेळीच थांबायला हवे, अन्यथा एक दिवस या सर्वांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, यासंदर्भात पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही 

*प्रतिक्रिया

कामे झाली होती पण निधी मिळाला नाही, कोरोना काळामध्ये हा विलंब झाला आहे, -विकास जाधव (उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, शहापूर)

माझ्या गावासह तालुक्यातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई आहे, ग्रामसेवका पासून ते पाणी पुरवठा अधिका-यांना भेटण्याचा प्रयत्न केला, फोन केले पण कोणी ऐकायला तयार नाहीत, आम्ही काय करावे- प्रकाश पाटील, तक्रारदार, शहापूर.

No comments:

Post a Comment