Thursday, 21 April 2022

कै. अरुणजी दिघे स्मृती कबड्डी स्पर्धेचा 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस' यांच्या उपस्थितीत शुभारंभ !!

कै. अरुणजी दिघे स्मृती कबड्डी स्पर्धेचा 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस' यांच्या उपस्थितीत शुभारंभ !!


कल्याण, वैष्णवी माळी : कै. अरुणजी खंडू दिघे स्मृती कबड्डी स्पर्धेला आजपासून कल्याण येथे सुरुवात झाली. कल्याण पूर्व कोळसेवाडी विभागातील कर्मवीर दादासाहेब क्रीडांगणात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस' यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ झाला. श्री हनुमान सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण दिघे यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री हनुमान सेवा मंडळाने या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. सदर आयोजनात कल्याण पुर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभलं. कै. अरुण दिघे यांचे कबड्डी प्रमाणेच भाजपाचे ही जिव्हाळयाचे नाते होते. ते भाजपाचे कल्याण शहर सरचिटणीस होते. सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी अरुण दिघे यांच्या स्मृतीला उजाळा देत दिघे यांच्या कार्यपध्दतीच गौराव केला.

यावेळी आमदार गणपत गायकवाड, आमदार रविंद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, अभिमन्यु गायकवाड व अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment