Thursday, 7 April 2022

बाळू बडगूजर ह्यांना अखेरचा लालसलाम !!

बाळू बडगूजर ह्यांना अखेरचा लालसलाम !!


चोपडा, बातमीदार.. कमुनिस्ट पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते कॉम्रेड बाळू बडगूजर रा. पिंपळगाव, हरेश्र्वर, ता. पाचोरा जिल्हा जळगाव यांचे १ एप्रिल २०२२ रोजी हृदयविकाराने दुखःद निधन झाले त्यांचा परचे असा. ते १९७५ सालापासून भाकप चे कार्यकर्ते पदाधिकारी होते. शेतमजूर युनियन चे जिल्हाध्यक्षही होते. पक्षाच्या राज्य कौन्सिल चे सभासद निवडून आले होते. मुंबई, नागपूर, जळगाव  दिल्ली च्या अनेक आंदोलनात त्यांचा जोषपूर्ण सहभाग राहिला होता. ते हाडाचे शेतकरीही होते त्यांनी काही काळ चांगली शेतीही केले त्यांनी. २/३ वेळा कार्यकर्त्यांची शिबिरेही आयोजित केली होती..घोषणा देणेत त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हता.. ते एक अभ्यासू नेते होते. २००० मध्ये ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी शी जुळले होते. ग्रामपंचायत कर्मचारी संघाचेही त्यांनी काम केले होते. त्यांचे काका कॉम्रड बाबुराव बडगुजर यांच्या प्रेरणेने त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वीकारला. कामरेड व्ही बी  मोरे ,स ना भालेराव,काम अंबोडेकर बुवा यांचे सोबत त्यांनी बरीच वर्षे काम केले. पिंपळगाव वी का सोसायटी चेअरमन कॉम्रेड भिका तोताराम माळी याना त्यांनी निवडून आणण्यात सहभाग होता. गावातील सधन शेतकरी कै. फकिरा तुकाराम क्षीरसागर व काम्रेड कासार, कडूबा माळी, गुलाम दस्तगीर बागवान या पक्ष सदस्य सहानुभूती दार हे त्यांचे खास दोस्त होते १९९८ पूर्वी फळीच उभारली होती.  काम्रेड ल स कारखानीस, मुंबई हे पक्ष राज्य सचिव  त्यांचेकडे मुक्कामाला होते. अलीकडे प्रा. प्रकाश चौधरी, अमृत महाजन, प्रा. डी एफ पाटील यांचे शी त्यांचा घनिष्ट संबंध होता. ते पक्षाची गाणेही चांगले म्हणत "बाई मी धरण धरण बांधते माझे मरण मरण कांडीते" हे त्यापैकी एक आवडते गाणे होते त्यांचा मुलगा अजय व त्यांची सौभाग्य वती त्यांना नेहमीच साथ देत.. हरेहर पिंपळ गावा मधील धग धगते चैतन्य त्यांच्या निधनाने थांबले. त्यांचं कार्य पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली व आव्हान आहे. त्यांची निष्ठा त्याग संघर्षाला जळगाव जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी चा लाल सलाम.. !!😘😘💐💐

No comments:

Post a Comment