Monday, 24 October 2022

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना, वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने टाटा कॅन्सर हॉस्पिटल परेल येथे दिवाळी सनानिमित्त कर्करुग्ण बालकांना खेळणी, फळे, डेली युज किटचे वाटप !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना, वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने टाटा कॅन्सर हॉस्पिटल परेल येथे दिवाळी सनानिमित्त कर्करुग्ण बालकांना खेळणी, फळे, डेली युज किटचे वाटप !


मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :
               शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना, वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुंबईचे माजी महापौर श्री. महादेव देवळे यांच्या हस्ते व जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टाटा कॅन्सर हॉस्पिटल परेल येथे संघटनेच्या वतीने दिवाळी सनानिमित्त कर्करुग्ण बालकांना खेळणी, फळ व त्यांना डेली युज किट (त्यामध्ये टूथ ब्रश, टूथपेस्ट, तेल, हॅण्ड टॉवेल व इतर) वस्तूंचे वाटप करण्यात आले नंतर स्थानीय लोकाधिकार समितीच्या ऑफिसमध्ये संघटनेच्या वतीने मा.महापौर श्री.देवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 


तसेच यशवंत खोपकर (मायेची सावली- संस्थापक) यांचा त्यांच्या वाढदिवसनिमित्त मा. महापौर महादेव देवळे यांच्या हस्ते पुष्प करंडक, शाळ, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे कार्यकर्ते व AIACPC चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. अमित देशमुख, महा. महिला सचिव सौ. ज्योतीताई भोसले, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. अमित सुळे, WHRAF च्या मुंबई सरचिटणीस सौ. प्रमिला अडसूळ, मुंबई सचिव सौ. ऋतिका पंदूगडे, स्थानीय लोकाधिकार समिती चे श्री.नितीन गवळी, श्री. जगदीश सोलंकी, श्री. नितीन नाईक, श्री. गणेश कांबळे, AIACPC चे मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड, श्री. दत्तराज आंब्रे, श्री. लीतेश केरकर, घाट.सचिव श्री. प्रकाश आंब्रे, मायेची सावली ग्रुप श्री. राजू पेडणेकर, श्री. सचिन राऊत, श्री. सुहास परब, श्री.विशाल नार्वेकर, श्री.अक्षय शिंगरे, अंजली भोसले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment