Friday, 8 December 2023

संपाच्या मागण्या पुराव्यासाठी चोपड्यात मोर्चा ! १२ डिसेंबरला कलेक्टर कचेरीवर जेलभरो !!

संपाच्या मागण्या पुराव्यासाठी चोपड्यात मोर्चा ! १२ डिसेंबरला कलेक्टर कचेरीवर जेलभरो !!

*अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संपाचा  ६ वां दिवस*

चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्यातील एक लाख अंगणवाडी केंद्रे मधील दोन लाख सेविका मदतनीस त्यांच्या खालील मागण्यासाठी ४ डिसेंबर पासून संपावर आहेत. त्यात शहरी, ग्रामीण, आदिवासी, भागातील सेविका मदतीसह मिनी अंगणवाडी केंद्र यादेखील सहभागी आहेत. तसेच सुशिक्षित बेरोजगार नवीन सेविका मदतनीस ज्यांना शासकीय नोकरी नसल्यामुळे कमी पगारावर मानधनाची नोकरी स्वीकारावी लागली अशा नवीन सेविका मदतनीस यांच्या देखील समावेश आहे. 

गेल्या पाच वर्षापासून केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांच्या  वेतनात वाढ केलेली नाही म्हणून त्या संपावर आहेत, संपाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चोपडा येथे कामगार नेते कॉम्रेड अमृत महाजन, यांच्या नेतृत्वाखाली अल्प बचत भवन पासून तहसीलदार कार्यालय वर जोरदार मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना खालील मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनातील मागणी अशा..

_____सर्वोच्च न्यायालयाच्या सिविल अपील नंबर 3153 / 2022 च्या अंतिम निकालाची अंमलबजावणी करावी त्यात म्हटल्याप्रमाणे की, अंगणवाडी सेविका याना मिळणारा मोबदला वेतनच आहे तरी त्यानुसार त्यांना शासकीय कर्मचारी घोषित करून वेतनश्रेणी भविष्य निर्वाह निधी ग्रॅजुएटी, सामाजिक सुरक्षा इत्यादी सर्व लाभ देण्यात यावेत.

_____आशांच्या मानधनात जाहीर केलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना ताबडतोब भरीव मानधन वाढ जाहीर करावी. मदतनीस सेविकांचे मानधन किमान अनुक्रमे 18000₹ ते 26000₹ पर्यंत असावे सेविका मदतनीसंच्या मानधनात 100 :75 असां फरक  असावा

____मानधन वाढले तरी महागाई त्याच्या दुपटीने वाढल्यामुळे ते कमीच पडते तरी मानधन महागाई निर्देशांक जोडून दर सहा महिन्यांनी त्यात निर्देशांकानुसार वाढ करावी.

____माननीय महिला बाल विकास मंत्री यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे विना योगदान मासिक निर्वाह भत्ता (पेन्शन) सेवा निवृत्ती नंतर देण्याचा प्रस्ताव माननीय मंत्र्यांनी मान्य केल्याप्रमाणे नोव्हेंबर २३ अखेरपर्यंत तयार करून तो हिवाळी अधिवेशनात मंजूर करून घ्यावा.

____महानगरपालिका हद्दीत जागेच्या निकषांवर वर अंगणवाड्यांसाठी पाच हजार ते आठ हजार रुपये भाडे मंजूर करावे.

____बालकांचे आहाराचा आठ रुपये दर अत्यल्प असून त्यामुळे कुपोषण निर्मूलन होण्याऐवजी उलट त्यात वाढ होत आहे, तरी हा सर्वसाधारण बालकांसाठी 16 व अति कुपोषित बालकांसाठी 24 रुपये असावा.. 

मोर्चाचे निवेदन श्रीमती लता पाटील, पुष्पावती मोरे ,सुरेखा पाटील, पुष्पलता पाटील दिव्यश्री बाविस्कर यांचा शिष्टमंडळाने सादर केले सदर निवेदन शासनाकडे पाठवतो असे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सांगितले. मोर्चामध्ये चोपडा तालुक्यातील प्रकल्प एक व प्रकल्प दोन मधील सेविका मदतीस यांनी हिरीरीने भाग घेतला त्यात मीनाक्षी पाटील आलका पाटील, संगीता पाटील, सोनाली धनगर, अनिता सावडे, शितल पाटील, मीना पाटील, मंगला पाटील, संध्या पाटील, सुरेखा पाटील, नशिबा तडवी, रुजवाना तडवी, मनीषा पाटील, बेबाबाई तडवी, वैशाली भरत चौधरी, मेघा बारेला, जानू बारेला, नर्मदा कोळी, अनिता पिंपराळे, कमल पाटील, उषा पाटील आदी १५०/२०० सेविका मदतनीसांचा समावेश होता.. 

***महाराष्ट्र सरकारने या मागण्याची दखल घ्यावी म्हणून *येत्या मंगळवारी 12 डिसेंबर रोजी जळगाव येथे सकाळी अकरा वाजता महात्मा गांधी उद्यान चौकात जमून कलेक्टर कचेरीवर जेल भरो आंदोलन केले जाणार आहे.

***तसेच 15 डिसेंबर रोजी नागपूर विधानसभेवर जोरदार मोर्चाच्या आयोजन करण्यात आलेले आहे, मोर्चासाठी 14 डिसेंबर रोजी सायंकाळी भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव या सोयीच्या ठिकाणी सायंकाळी  सेवाग्राम एक्सप्रेस ने जाण्यासाठी यावे अशी आवाहन कॉम्रेड महाजन यांनी केले आहे..

1 comment:

  1. उत्तम माहिती मिळाली आपल्या बतमीतून

    ReplyDelete