Thursday, 7 December 2023

नालासोपारातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जम्बो पक्षप्रवेश.....

नालासोपारातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जम्बो पक्षप्रवेश.....

नालासोपारा , प्रतिनिधी‌ : नालासोपारा पश्चिम मधिल हनुमान नगर, स्टेशन परिसरातील शिवसेनेच्या या जम्बो प्रवेशाने येथील वातावरण शिवसेनामय झाले.

अनेक राजकीय पक्षांना भगदाड पडत असताना दुसरीकड़े शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग ही सुरु आहे.
महाराष्ट्राचे राज्याचे *मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब* यांचा विचाराने  प्रेरित होऊन आज नालासोपारात  मधिल युवा कार्यकर्ते यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला.

शिवसेना उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख आ.श्री रविंद्र फाटक साहेब यांच्या आशीर्वादाने  व जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या सुचनेनुसार तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे यांच्या उपस्थितीत  नालासोपारातील युवा  कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
 

राजकारणातील घडामोडींनी आता वेग घेतला आहे. शिवसेना पक्षाने  पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आपली बांधणी सुरु केली आहे. यावेळी उपतालुकाप्रमुख अजितभाऊ खांबे यांनी शिवसेना नेहमीच समाजकारणाला महत्व देते असे सांगून या नालासोपारा शहरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.  शिवसेनेची घोडदौड अशीच सुरु राहणार असून येणार्‍या सर्व निवडणुकीत शिवसेना चांगल्या प्रकारे यश प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी  महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, शहरप्रमुख आनंद नगरकर, युवा शहरप्रमुख समीर गोलांबडे, विभागप्रमुख दानिश करारी व  शाखा प्रमुख तसेच कार्यकर्ते उपस्थित होते..

No comments:

Post a Comment