Thursday, 24 November 2022

तळवळीत आभुषण जनरल शॉपीचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञाताई ताम्हणकर यांची उद्योग क्षेत्राकडे भरारी !

तळवळीत आभुषण जनरल शॉपीचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञाताई ताम्हणकर यांची उद्योग क्षेत्राकडे भरारी !

[कोकण / गुहागर : उदय दणदणे] 
दिनांक-२४/११/२०२२

गुहागर तालुक्यातील निगुंडळ गावच्या सामाजिक कार्यकर्त्या तसेच  सामर्थ्य सेवा संस्थेच्या सचिव प्रज्ञा ताम्हणकर यांनी व्यवसायाचे दिशेने वाटचाल करत ग्राहकांच्या सेवेसाठी  गुरुवार दिनांक- २४ नोव्हेंबर २०२२ रोजी "आभुषण जनरल शॉपी" चे आपल्या कुटुंब सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत साध्या पध्दतीने शुभारंभ करण्यात आला. एम,एस,डब्लू, (MSW)  बी.कॉम (B. COM) पदवीधर असणाऱ्या प्रज्ञा ताम्हणकर या गेली अनेक वर्ष  गावात  सामर्थ्य सेवा संस्थेच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.आपल्या वडिलांचं आदर्श घेत समाजात  शून्यातून विश्व निर्माण करणारी,लढणारी, खंबीरपणे उभी राहणारी प्रत्येक व्यक्ती माझे आदर्श आहेत.असे त्या आवर्जून सांगतात. प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षम असावी या साठी ते नेहमी आग्रही असतात. महिलांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करून आपले आर्थिक स्रोत निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रज्ञा ताम्हणकर यांनी महत्वपूर्ण माहिती देताना सांगितले. तळवलीत सुरू करण्यात आलेल्या "आभुषण जनरल शॉपी"  मध्ये कॉस्मेटिक, टेलरिंग, सलून, पार्लर, मेकअप, गारमेंट्स इत्यादी सेवा उपलब्ध राहतील असे आभुषण जनरल शॉपी च्या प्रो. प्रा.प्रज्ञाताई ताम्हणकर यांनी सांगितले. शुभारंभ प्रसंगी अनेक ग्रामस्थांसह पेवे गावच्या सामजिक कार्यकर्त्या तसेच पेवे ग्रामपंचायत सदस्या प्रिती सुरज हरचिलकर यांनी प्रज्ञाताई ताम्हणकर यांचे खास अभिनंदन करून पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...