Wednesday, 13 May 2026

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

*श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान*

रत्नागिरी, प्रतिनिधी :
लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध  कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, त्यानंतर सभा, सत्कार व  दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक व  महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर  यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देवून या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच  "हा छंद प्रियेचा" हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.लोकप्रिय दिग्दर्शक, प्रसाद धोपट व रणरागिणी ताराराणी  नाटक फेम,स्टार प्रवाह वरील 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेमधील 'पूजा' अभिनेत्री 'ज्योती निमसे आदीनी हा नाट्यप्रयोग सादर केला.न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचे भव्य पटांगणात हे कार्यक्रम पार पडले. यावेळी डॉ. मयुरेश मोहिते, अध्यक्ष स्वप्नील मोहिते, वैभव पवार, नितीन सावंत, सुरेश मोहिते, रमेश सावंत, गंगाराम पवार, महेश पवार, मुकेश पवार, सुदेश पवार, सुजित मोहिते, सुरज मोहिते, सागर मोहिते, रोहित मोहिते, सिद्धार्थ मोहिते सुधाकर मोहिते. योगेंद्र कल्याणकर, डॉ. विकी सावंत, श्रीमती ऋतुजा जाधव, राजेश जाधव, दीपक लिंगायत, उमेश रहाटे, अनिकेत सुर्वे, अरुण मोर्ये, सरपंच साजिद शेकासन, ओंकार शिर्के, अविनाश केदारी, राजेश जाधव आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Tuesday, 12 May 2026

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद?

अंबरनाथमध्ये भाजप-शिवसेना युतीवरून शिवसेनेतच मतभेद?

** सुनील चौधरींच्या युती प्रस्तावाला राजेंद्र वाळेकरांचा विरोध

अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ शहरातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीच्या चर्चेला वेग आला असतानाच शिवसेनेतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे चित्र समोर आले आहे. शिवसेनेचे सुनील चौधरी यांनी भाजपसोबत युतीचा प्रस्ताव मांडल्याची चर्चा सुरू असताना, माजी नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी या प्रस्तावाला उघड विरोध दर्शवला आहे.

सोमवारी सुनील चौधरी आणि काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसोबत युतीबाबत भूमिका स्पष्ट केली. मात्र, या निर्णयावर पक्षातीलच काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्याने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.

“नगरसेवकांना विश्वासात न घेता युतीचा प्रस्ताव पुढे करण्यात आला. पक्षातील पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही,” असा आरोप राजेंद्र वाळेकर यांनी केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप युती संदर्भात मुंबई येथे वरिष्ठ पातळीवर बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बैठकीत जागावाटप आणि स्थानिक पातळीवरील राजकीय रणनीती यावर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

युतीबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असले तरी अंबरनाथमधील स्थानिक पातळीवरील मतभेदांमुळे शिवसेनेत अस्वस्थता वाढल्याचे दिसून येत आहे.

मात्र राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष सदामामा पाटील व शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. “वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय आम्ही काहीही बोलणार नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

गव्हाणफाट्याचा राडारोडा विंधणे जवळ फेकणार ; आसामच्या ठेकेदाराला कंत्राट; सिडकोचा प्रताप !!

गव्हाणफाट्याचा राडारोडा विंधणे जवळ फेकणार ; आसामच्या ठेकेदाराला कंत्राट; सिडकोचा प्रताप !!

सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी केलेल्या माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती उघड.

उरण मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असलेल्या पनवेल तालुक्यातील गव्हाणफाटा ते उरण तालुक्यातील जासई येथील परिसरात जमिन विकसित करण्याचे कंत्राट सिडकोने चक्क आसामच्या एका कंपनीला दिले आहे. तो राडारोडा उचलून उरण तालुक्यातील विंधणे गावाजवळ फेकण्यात येणार असल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे.ही बाब सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी विविध नागरी व पर्यावरण समस्या वर अनेकदा आवाज उठविला आहे. अनेक समस्या शासन दरबारी मांडले आहे.उरणचे सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी सिडकोकडे मागितलेल्या माहितीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. उरण परिसरात अटल सेतू, अलिबाग कॉरिडोअर आणि तिसऱ्या मुंबईच्या अनुषंगाने विकास कामांना गती मिळत आहे. काही खासगी बिल्डरांनीसुद्धा इकडे जमिनी खरेदीसाठी मोर्चा वळविला आहे.जमिनीला जास्त किंमत असल्यामुळे नवी मुंबई विमानतळाशेजारी जमिनी खरेदी विक्रीला उधाण आले आहे.त्यातच सिडकोने गव्हाण फाटा ते जासई भागातील जमिनी विकसित करण्याचा सपाटा लावला आहे. मधल्या काळात मुंबईतील विविध भागांतून काढण्यात आलेला राडारोडा आणि इतर कचऱ्याचे ढीग गव्हाणफाटा, जासई शंकर मंदिर परिसरात रचण्यात आल्याने तेथे सिडको अधिकाऱ्यांच्या आशिर्वादामुळे डम्पिंग ग्राऊंड आणि कचऱ्याचे मोठे डोंगर उभे राहिले आहेत.

सिडको अधिकाऱ्यांच्या हफ्तेखोरीमुळे जमिनी विकसित करण्यावर आता कोट्यवधी रुपये खर्च करावे लागणार आहेत. मोठया मोठया उद्योगपतीचा डोळा उरण व उरणच्या आसपास च्या जमिनीवर आहे.त्यामुळे जमीन विकसित करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु आहे. त्यातच कंत्राट आसाम येथील भारतीय इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे, अशी माहिती उरणचे सामाजिक कार्यकर्ते अजित म्हात्रे यांनी दिली आहे.यावरून सिडको अधिकाऱ्यांच्या बदमाशीचे पितळ पुन्हा उघडे पडले आहे. हा संपूर्ण कचरा, राडारोडा सिडको हद्दीबाहेर टाकण्याचे ठरले असून त्यासाठी उरण तालुक्यातील पूर्व भागातील विंधणे गावाच्या परिसराची निवड केली आहे.त्यामुळे विंधणे आणि आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला सिडकोने शत्रू निर्माण केल्याची भावना पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या राडारोडा मुळे, कचऱ्या मुळे दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण मिळणार असल्याने उरणच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होऊ लागली आहे

मोहोने खडकपाडा दुर्गाडी बससेवा सुरू ; महिला व कामगार वर्गात समाधान !

मोहोने खडकपाडा दुर्गाडी बससेवा सुरू !!

** महिला व कामगार वर्गात समाधान

कल्याण, संदीप शेंडगे : मोहने काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राजेश वाघमारे यांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने मोहोने – खडकपाडा – दुर्गाडी या नव्या बससेवेचा शुभारंभ मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता मोहोने गेट येथे महिला कामगार कार्यकर्त्यांच्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. या बससेवेमुळे मोहोने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे. तसेच नागरिकांचा वेळ वाचून पैसाही वाचणार आहे.

मोहोने टिटवाळा ब्लॉक  अध्यक्ष तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश विष्णु वाघमारे यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राजेश वाघमारे हे परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार करून बैठका घेऊन त्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून घेतला या कामी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर, आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला तसेच परिवहन विभागाने साथ दिल्याने बस सेवा सुरू होऊ शकली असे वाघमारे यांनी सांगितले.

या नव्या बससेवेचा लाभ विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच दुर्गाडी देवस्थान येथे जाणाऱ्या भाविकांना होणार आहे. खडकपाडा, आधारवाडी परिसरातील महिलांना शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये पोलीस स्टेशन रुक्मिणीबाई प्रसूती गृह कॉलेज खडकपाडा पोलीस ठाणे तसेच घरकाम करणाऱ्या महिला व सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्यांना या बस सेवेचा अधिक फायदा होणार आहे. तसेच आवश्यक सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. दुर्गाडी किल्ला व परिसर पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही या बससेवेचा फायदा होणार आहे. असे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ पातकर यांनी सांगितले

विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा, महिलांसाठी सुरक्षित प्रवास तसेच नागरिकांचा वेळ आणि प्रवास खर्च वाचविणारी ही सेवा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोहोने परिसरातील सर्व नागरिकांनी

या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 
ज्येष्ठ काँग्रेस नेते मामा पगारे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष दशरथ पाटील, माजी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विष्णु वाघमारे, मोहोने ग्रामस्थ मंडळ प्रमुख सुभाष पाटील, माजी नगरसेवक भीमराव डोळस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सुरेश सोनार, विजय परियार, नाना भालेराव, संध्या ठोसर, काँग्रेसचे एस.सी सेलचे जिल्हाध्यक्ष अँड. अजिंक्य साळवे, नागेश भोईर, हरिश्चंद्र पाटील, अशोक काळपुंड, राजेश दीक्षित, वेंकटेशन, अशपाक शेख, बाळा बर्वे, विवेक घोडके, अजय रामचंद्रन, धर्मांना मेडी, उर्मिला भोईर, अश्विनी वाघमारे, सुजाता वाघमारे, दर्शना पानपाटील, मेहनाज शहा, वर्षा माने, रंजना उपदेशे, निर्मला गोडबोले, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश कोनकर, रमेश रोकडे, पांडुरंग वाघमारे, विजय बोरे, रोहिदास भालेराव आरपीआय पक्षाचे रमेश भालेराव, सामाजिक कार्यकर्ते रमेश नंबियार, बौद्धाचार्य गौतम मोरे, ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तम शेंडगे व इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते व मोहोने शहरातील नागरिक उपस्थित होते.

खडवलीत वारंवार वीज पुरवठा खंडित प्रकरणी शंभूदुर्ग संघटनेचा मोर्चा !!

खडवलीत वारंवार वीज पुरवठा खंडित प्रकरणी शंभूदुर्ग संघटनेचा मोर्चा !!

कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या अनेक दिवसांपासून खडवली व आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून महावितरणाचा भोंगळ कारभार सुरू आहे. परिसरातील नागरिक सतत त्रस्त झाले आहेत. याची दखल घेऊन शंभूदुर्ग संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान महावितरण अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

शंभूदुर्ग संघटनेचे महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा सागर मोरे, राज्य संघटक संजय पाटील व महिला अध्यक्षा जयवंती लोणे, उपजिल्हा अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा खडवली महावितरण कार्यालयावर काढण्यात आला होता.

खडवली विभागाचे महावितरणाचे कनिष्ठ अभियंता योगेश चेंदवनकर यांना निवेदन देण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करणे, जुना व नादुरुस्त तारा लाईन टाकणे, विजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करणे, नवीन ट्रान्सफॉर्मर देताना योग्य जागेची पाहणी करणे, जुने मीटर बदलून नवीन मीटर देणे, तसेच परिसरातील अनेक तांत्रिक अडचणी दूर कराव्यात अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

यावेळी शंभूदुर्ग संघटनेच्या महिला तालुका अध्यक्षा जयवंती लोणे यांनी सांगितले की, खडवली परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. लहान मुलांचे शिक्षण, व्यापारी वर्ग तसेच रुग्णालयीन सेवा यावर परिणाम होत आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

महावितरणाचे कनिष्ठ अभियंता योगेश चेंदवनकर यांनी सांगितले की, आज सकाळी लाईन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून पुढील काळात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत. दोन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम प्रस्तावित आहे. तसेच विजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

यावेळी शंभूदुर्ग संघटनेचे कल्याण तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच चेतन शेलार, उद्योजक सदाशिव मोरे, संघटनेचे आरोग्य विभागाचे जिल्हाध्यक्ष संदेश लोणे, सचिव रुपेश खंडागळे, देवा सोनावले, अक्षय ठिगळे, वैभव मोरे, खडवली रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ मोरे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण मोरे, कुणाल दलाल, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मोरे, सचिन सावंत, भोला सिंग, ऋतिक पाटील, वासुदेव शेलार यांच्यासह खडवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday, 10 May 2026

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

          सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धनाजी कराडे यांच्या 'युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' या कवितासंग्रहाचे आज  सातारा येथे 15व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनामध्ये संमेलनाचे अध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत यांच्या हस्ते उद्घाटन सत्रात प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात मशाल प्रज्वलित करून   'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी केले. 
       यावेळी संमेलनाचे उद्घाटक ह. भ. प सुहास फडतरे, संमेलनाध्यक्ष लोकशाहीर आयु. संभाजी भगत, संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ विचारवंत डॉ. सोनाझरीया मिंझ, स्वागतातध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, माजी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत भारत पाटणकर, कॉम्रेड धनाजी गुरव, 'युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' या कविता संग्रहाचे कवी धनाजी कराडे, वडगाव नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा स्वाती कराडे, डॉ. संतोष भोसले डॉ. किरण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत 'युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' या कविता संग्रहाचे प्रकाशन समारंभ पार पडला.

वृत्तांकन - विलासराव कोळेकर सर 

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

निर्भिड पत्रकार सुरेश म्हात्रे यांचे निधन !

पेण (पंकजकुमार पाटील) : 
पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ताहिक 'रायगडची शान' चे संपादक सुरेश सीताराम म्हात्रे यांचे दिनांक ७ मे रोजी हृदय विकाराच्या झटक्याने  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी (पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुका सचिव) अवंतिका म्हात्रे, दोन मुली एक मुलगा व इतर नातलग  असा परिवार आहे.

" *शब्दांची लेखणी विसावली, विचारांचा सूर्य मावळला...* 

सुरेश म्हात्रे यांची एक निर्भीड पत्रकार, सच्चा विचारवंत अशी ओळख होती. त्यांनी आपल्या लेखणीतून  केवल  बातम्या लिहिल्या नाहीत, तर समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. समाजातील  अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी तलवारीपेक्षा धारदार होती. जनतेच्या समस्या  शासन -प्रशासन दरबारी पोहचवून प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचा त्यांचा  प्रामाणिक प्रयत्न राहिला. सत्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांच्या वेदनेला वाचा फोडणारा तो आवाज आज कायमचा शांत झाला आहे. 

🙏🙏 त्यांचा  उत्तरकार्य विधी-  दशक्रिया विधी शनिवार दि. १६ मे  रोजी उद्धर -पाली  येथे होईल. तर तेरावा विधी मंगळवार दि. १९ मे  रोजी राहत्या घरी गडब, काराव पेण येथे होईल असे त्यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.

Saturday, 9 May 2026

सैतवडे येथील उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान यांना पी. एच डी पदवी !!

रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे येथील  उझैर आदिल चिलवान (डॉ. आदिल महामूद चिलवान यांचे सुपुत्र) यांनी स्पीच थेरपी आणि स्वॅलॉइंग डिफिकल्टीज या विषयात त्यांनी PhD पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. उझैर यांनी स्ट्रोकनंतरचे रुग्ण, मुलांमधील भाषण विकासातील विलंब, बोलू न शकणारे रुग्ण तसेच घशाच्या मोठ्या शस्त्रक्रियेनंतर गिळण्यास अडचण येणाऱ्या रुग्णांवर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची National Speech Therapist of the Year म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान सोहळा दिल्ली येथे पार पडला.या यशाबद्दल घुमटकर ग्रुप परिवारातर्फे उझैर चिलवान यांचे  व त्यांचे वडील डॉ. आदिल महमूद चिलवान यांचेही
अभिनंदन  करण्यात आले.

त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाले आहे.त्यांना यश, आरोग्य आणि समाजसेवेची संधी  मिळो अशा घुमटकर ग्रुपच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ !!

जावलीत शैक्षणिक क्रांतीला नवी दिशा

UPSC-MPSC मार्गदर्शनासाठी पुढाकार; गुणवंत विद्यार्थ्यांना मिळणार नवे व्यासपीठ !!

प्रतिनिधी | जावली

श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांच्या पुढाकारातून जावली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात “शिक्षणाचं माहेरघर” म्हणून ओळख निर्माण केलेल्या जावली तालुक्यात आता UPSC आणि MPSC परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन, मोटिवेशनल लेक्चर्स आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

डोंगराळ भौगोलिक परिस्थिती आणि शेतीसाठी मर्यादित साधनसंपत्ती असूनही जावली तालुक्यातील अनेक कुटुंबांनी शिक्षणालाच प्रगतीचा मुख्य मार्ग मानला. त्यातूनच सातारा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला “जावली पॅटर्न” उदयास आला. आज तालुक्यातील अनेक विद्यार्थी UPSC आणि MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली ही शैक्षणिक क्रांती संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

विशेष म्हणजे, जावली तालुक्यातून UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS अधिकारी होणारे पहिले अधिकारी म्हणून श्री ओमकार पवार सर यांनी जावली तालुक्याचा गौरव वाढवला आहे. त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवी प्रेरणा निर्माण झाली असून स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्या प्रेरणेतून आणि राज्यातील वरिष्ठ राजपत्रित अधिकारी तसेच मंत्रालयीन अनुभवाच्या बळावर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी, अधिकाधिक क्लास वन व क्लास टू अधिकारी घडावेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

येत्या काळात जावली तालुक्यात विविध मोटिवेशनल लेक्चर्स, हायस्कूल स्तरावरील करिअर मार्गदर्शन, नवीन उद्योजक घडविण्यासाठी मार्गदर्शन, विविध क्षेत्रांतील नोकरी संधींबाबत माहिती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी तालुक्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी व क्लास वन अधिकारी देखील सहकार्य करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जावलीच्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारे हे कार्य काळाची गरज असून श्रीमान्य आर. के. धनावडे साहेब यांनी असेच प्रेरणादायी कार्य पुढेही सुरू ठेवावे, अशा भावना जावली युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रसिद्ध समाजसेवक तथा उद्योजक डॉ. विजय दिघे आणि जावलीकरांकडून व्यक्त होत आहेत.

विशेष लेख/प्रसिद्धी - विलासराव कोळेकर सर 

उरण न्यायालयासमोर पडक्या इमारतीत गांजाची नशा ; पोलिसांचा छापा, चौघांवर गुन्हा दाखल !

उरण न्यायालयासमोर पडक्या इमारतीत गांजाची नशा ; पोलिसांचा छापा, चौघांवर गुन्हा दाखल !

निर्जन इमारती ठरताहेत नशेबाजांचे अड्डे.
 
उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरात न्यायालयाच्या अगदी समोरच अलिबाग वन विभागाच्या वापरात नसलेल्या पडक्या इमारतीत गांजा ओढणाऱ्या चौघा तरुणांना उरण पोलिसांनी शनिवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे उरणमधील निर्जन व पडक्या इमारती नशेबाजांचे अड्डे बनत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १३०/२०२६ अन्वये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ मे २०२६ रोजी दुपारी १२:३५ वाजताच्या सुमारास उरण कोर्टाच्या समोर असलेल्या अलिबाग वन विभागाच्या जुन्या, पडक्या इमारतीत काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोउपनि गोविंद केंद्रे व पथकाने दुपारी १२:२५ ते १२:५५ या वेळेत घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी सौरभ बिस्वनाथ प्रामाणीक, वय ३०, रा. अर्श टॉवर बी/२०१, उरण कोर्ट जवळ; हर्षल विनायक भोईर, वय २४, रा. भोईरआळी, नवीन शेवा; हेमंत बबन कोळी वय ३२ रा. घर नं. ५६/डी  हनुमान कोळीवाडा राम मंदिरासमोर; आणि जुगल लक्ष्मण पाटील, वय २३, रा. पाण्याचे टाकीजवळ केगाव आवेडा हे चौघेजण 'गांजा' या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये चौघांनाही नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. 

या घटनेची नोंद ३ मे २०२६ रोजी दुपारी ३:२३ वाजता उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम पोउपनि निलेश कोंडाळकर यांनी केले असून प्राथमिक तपास पोउपनि गोविंद केंद्रे करत आहेत. 

उरण शहरात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या वापराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः समुद्रकिनारी असलेल्या केगाव, पिरवाड, दांडा तसेच शहरातील पडक्या इमारती, बंद पडलेले गोडाऊन व निर्जन जागा यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गांजा सेवन प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली होती. उरण हे जेएनपीटी बंदर व द्रोणागिरी नोडमुळे वेगाने विकसित होत असले तरी, येथील सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. 

न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणासमोरच दिवसाढवळ्या नशा केली जात असल्याने कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पडक्या सरकारी इमारतींची डागडुजी करावी किंवा त्यांना कुलूप लावून संरक्षित करावे, जेणेकरून त्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनणार नाहीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालय परिसर, न्यायालय, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. 

अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढत असून त्यासाठी समुपदेशन केंद्रे व जनजागृती मोहीम राबवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर पालक, शिक्षण संस्था व पोलिस यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे उरणमधील वाढत्या नशेखोरीवर पुन्हा प्रकाश पडला असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी : नगरपरिषदेच्या रस्त्यावरच वाळू-रेतीचे ढीग, वाहतूक कोंडी आणि अपघातांना आमंत्रण; प्रशासनाचे डोळेझाक, नागरिक संतप्त !!

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी : नगरपरिषदेच्या रस्त्यावरच वाळू-रेतीचे ढीग, वाहतूक कोंडी आणि अपघातांना आमंत्रण; प्रशासनाचे डोळेझाक, नागरिक संतप्त !!

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) :
 उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावरच बिल्डरांनी आपली मनमानी सुरू केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. खासगी इमारतीच्या बांधकामासाठी कोणतीही परवानगी न घेता भर रस्त्यातच रेती-वाळूचे ढीग टाकण्यात आले असून, अर्ध्याहून अधिक रस्ता अडवला गेला आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून अपघाताची टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर आहे. ‘उद्या अपघात झाला तर जबाबदार कोण? बिल्डर की ढिम्म प्रशासन?’ असा संतप्त सवाल उरणकर विचारत आहेत.

प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले की, उरण शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर इमारतीच्या बांधकामासाठी आणलेली रेती थेट रस्त्यावरच ओतली आहे. रस्त्याच्या निम्म्याहून अधिक भाग व्यापल्याने दुचाकी, रिक्षा व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर पसरलेल्या रेतीमुळे वाहनांची चाके घसरून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. रात्रीच्या वेळी तर दृश्यमानता कमी असल्याने धोका आणखी वाढला आहे.

नियम काय सांगतात ? बिल्डरला मोकळीक कोणी दिली  ? 

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ नुसार सार्वजनिक रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकण्यास सक्त मनाई आहे. बांधकामासाठी नगरपरिषदेची परवानगी घेणे बंधनकारक असून, रस्ता अडविल्यास संबंधित बिल्डरवर दंडात्मक व फौजदारी कारवाईची तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम ४८(७) अन्वये अवैधपणे रस्ता अडवून केलेल्या कृत्यासाठी बाजारभावाच्या तिप्पट दंड आकारता येतो. 

तरीही उरणमध्ये मात्र बिल्डरांनी थेट रस्त्यावरच ‘साईट ऑफिस’ थाटल्यासारखे चित्र आहे. विशेष म्हणजे, ज्या नगरपरिषदेच्या कर निरीक्षक व मुख्य अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे, तेच मूग गिळून गप्प आहेत. ‘परवानगी आहे का?’ याची साधी विचारणाही न करता बिल्डरला मोकळे रान कोणी दिले, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

‘कुंपणच शेत खातंय’ – नागरिकांचा आरोप :- 

“बिल्डरने रेती रस्त्यावर टाकली आणि अर्धा रस्ता गायब झाला. शाळेची मुले, ज्येष्ठ नागरिक रोज जीव धोक्यात घालून जातात. उद्या अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार?  की बिल्डरच्या पैशापुढे सगळे हतबल आहेत?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी केला. उरण नगरपरिषदेला  तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. 

प्रशासनाला अंतिम इशारा:- 

बांधकाम साहित्यामुळे रस्ता अडवणे हा महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चा भंग आहे. असे असूनही उरण नगरपरिषद प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असल्याने ‘बिल्डर आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का?’ अशी शंका व्यक्त होत आहे. 

नागरिकांनी मागणी केली आहे की, १) तात्काळ रस्त्यावरील रेती-वाळू हटवावी. २) संबंधित बिल्डरवर दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करावा. ३) यापुढे विनापरवानगी रस्ता अडविल्यास थेट बांधकाम परवाना रद्द करावा. ४) निष्काळजीपणा करणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.

‘रस्ते हे नागरिकांच्या वाहतुकीसाठी आहेत, बिल्डरच्या गोदामासाठी नाहीत’ हे प्रशासनाने लक्षात ठेवावे. अन्यथा उरणकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.

मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे:- 

उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्वतः घटनास्थळी पाहणी करून २४ तासांत रस्ता मोकळा करावा. बिल्डरच्या मनमानीपुढे प्रशासन झुकणार असेल तर उद्या प्रत्येकजण रस्त्यावरच बांधकाम साहित्य टाकेल आणि उरणची वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडेल. कारवाईस झालेला विलंब एखाद्याचा जीव घेऊ शकतो, याचे भान प्रशासनाने ठेवावे.

उरण नगरपरिषदेच्या ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याचे नवी मुंबई पोलीस दलात निवड !!

उरण नगरपरिषदेच्या ‘माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय’ अभ्यासिकेच्या विद्यार्थ्याचे नवी मुंबई पोलीस दलात निवड !!

अभ्यासिकेचे १० वे यश ;;स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनालय ठरत आहे वरदान.

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : उरण नगरपरिषद संचलित माँ साहेब मीनाताई ठाकरे वाचनालय येथील अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या कु. श्रीकांत सांगोलकर या विद्यार्थ्याची नवी मुंबई पोलीस दलात नवीमुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांच्या हस्ते श्रिकांतचा सत्कार करण्यात आला.

सदर अभ्यासिका तत्कालीन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्रीकांत सांगोलकर याने हे यश संपादन केले आहे.  

विशेष म्हणजे, या अभ्यासिकेतील विद्यार्थ्याने मिळविलेले हे १० वे यश आहे. यापूर्वीही या अभ्यासिकेतील यापूर्वी ९ विद्यार्थी एमपीएससी, पोलीस, तलाठी, मुंबई महापालिका, खाजगी कंपन्या , अशा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झाले आहेत.  

श्रीकांतच्या या निवडीमुळे अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या इतर विद्यार्थ्यांमध्ये अधिक  उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रिकांत याने आपले मनोगत व्यक्त करताना उरणमधील ही एकमेव अभ्यासिका आहे तीथे आम्हाला वेळेचे बंधन नाही त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा नगरपरिषदेचा उद्देश सफल होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करताना ग्रंथपाल  संतोष पवार, सहाय्यक जयेश वत्सराज यांचे योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.यावेळी ॲड निरंतर सावंत यांनी श्रिकांतला मार्गदर्शन करताना सांगीतले आता थांबायचे नाही.जयेश वत्सराज यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे यश मिळविले आहे असे मत व्यक्त केले, ग्रंथपाल संतोष पवार यांनी श्रिकांतची जीद्द , चिकाटी आणि परिस्थितीवर मात करण्याची प्रबळ इच्छेच्या जोरावर श्रिकांतने हे यश मिळविले आहे असे मत व्यक्त केले. वाचनालयाच्या वतीने श्रिकांत आणि त्याच्या सतत पाठिशी खंबीरपणे पाठीशी उभे राहणाऱ्या आई बाबांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या यशाबद्दल उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी श्रीकांत सांगोलकर याचे अभिनंदन केले व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अभ्यासिकेस मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले. आणि अभ्यासिकेत सातत्याने अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार नगरपरिषदेमार्फत यापुढेही विद्यार्थ्यांसाठी इन्व्हर्टर व ईतर सुविधा अधिक सक्षमपणे पुरविल्या जातील, अशी ग्वाही नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.

एस ई झेड च्या जमीन फेरफार प्रकरणी तहसीलदार उद्धव कदम यांच्या कार्याचे चौकशीचे आदेश !!

एस ई झेड च्या जमीन फेरफार प्रकरणी तहसीलदार उद्धव कदम यांच्या कार्याचे चौकशीचे आदेश !!

कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केल्याचे तहसीलदार डॉ उद्धव कदम यांचे मत.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले चौकशीचे आदेश

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील हजारो एकर जमीन महा मुंबई एस ई झेड ह्या विशेष प्रयोजनासाठी  सन २०१० मध्ये संपादित करण्यात आली आणि त्या सर्व सातबारा वर मुंबई एस ई झेड चे नाव दाखल झाले. त्यामुळे सदर जमिनीच्या सात बारावर कोणत्याही व्यक्तीचे नाव कोणत्याही परिस्थितीत लागू शकत नाही. तरीही तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी दलालांच्या मदतीने सदरहू जमीन बेकायदेशीररित्या त्रयस्थ व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केली आहे. सदर जमिनींच्या किमती अब्जावधी रुपये सांगण्यात येत आहे. सदर केसेस मध्ये मुंबई एस ई झेड चे वकील ॲड सागर जगे यांनी लेखी म्हणणे आणि अवॉर्ड कॉपी सादर करून सदर हस्तांतरणास लेखी हरकत नोंदविलेली आहे. तरीही तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी हे काम केले आहे.त्यांना ह्याबद्दल विचारले असता त्यांनी रीतसर सुनावणी घेऊन कलम २३६ अन्वये कायदेशीररित्या आदेश पारित केल्याचे सांगितले. तहसलीदार उरण डॉ उद्धव कदम यांना मुंबई एस ई झेड यांच्या नावांच्या जागी त्रयस्थ व्यक्तीचे नाव सातबारा सदरी दाखल करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. मुंबई एस ई झेड उलवे येथील अधिकारी आणि लीगल टीम ने स्पष्ट सांगितले की आम्हाला तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी १५ नोटीस पाठविलेल्या असून त्या प्रत्येक केस मध्ये सदर हस्तांतरण बेकायदेशीर असून त्यास लेखी हरकत नोंदविलेली आहे तसेच प्रत्येक केस मध्ये अवॉर्ड कॉपी देखील सादर केलेली आहे.अवॉर्ड कॉपी सादर केल्यावर त्या जमिनीसंदर्भात कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार महसूल न्यायाधिकरणाला नाही तो अधिकार सिव्हिल कोर्टाला आहे. याचाच अर्थ तहसीलदार उरण डॉ उद्धव कदम यांनी सिव्हिल कोर्टाचे अधिकार वापरल्याचे स्पष्ट होत आहे. सिव्हिल कोर्टाचे अधिकार वापरून अब्जावधी रुपयांची जमीन अवैधरित्या हस्तांतरित करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा जमविल्याची चर्चा जनमानसात आहे. सदर बाब ही अत्यंत गंभीर असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ह्या विषयाच्या चौकशीचे आदेश दिले असून कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांना १५ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सदर चौकशीमध्ये किती सात बारा हस्तांतरित केले आहेत हे स्पष्ट होईल आणि ह्या अवैध्य हस्तांतरणमध्ये कोण कोण जबाबदार आहेत हे देखील स्पष्ट होणार आहे

जेएनपीए प्रशासनाने शेवा कोळीवाडा विस्थापितांची फसवणूक केल्या प्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी !!

जेएनपीए प्रशासनाने शेवा कोळीवाडा विस्थापितांची फसवणूक केल्या प्रकरणी SIT स्थापन करून चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी !!

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) :

शेवा कोळीवाडा विस्थापितांची जेएनपीए प्रशासनाने गेली ४० वर्षात पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक केल्याने या गुन्हेबाबतची चौकशी  विशेष तपास पथक (Special Investigation Team (SIT)  मार्फत तपास करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा बेटावरील मूळ रहिवाशी राहत होते.त्या ठिकाणी शेवा सर्व्हे नंबरची  सुमारे ८०० हेक्टरहून अधीक  सुपीक जमीन व शेवा बेटाच्या सभोवताली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ,१९६६ कलम २० मध्ये वर्षाच्या कोणत्याही हंगामात ,नेहमीच्या उधाणाच्या भरतीचे पाणी ज्या बिंदू पर्यंत चढते त्या उच्च्तम बिंदू पर्यंत समुद्राचा, खाड्यां ,नद्याच्या मुखातील तळ हि जमीन लोकांच्या जाण्या येण्याच्या हक्कांना आणि लोकांच्या किंवा व्यक्तींच्या कायदेशीर रीत्या अस्तित्वात असलेल्या सर्व हक्कांना अधीन राहील. आणि कलम २९४ टीका १ मध्ये किनाऱ्यालगतचा प्रदेश या वरील अस्तित्वात असलेले लोकांचे वापरण्याचे हक्क व इतर हक्क या कलमाने मान्य केलेले आहेत.अशी सुमारे २३५४२ हेक्टर मासेमारी जमीन होती. शेवा  बेटावर गावठणात  घरे-दारे समोर अंगणे, परस, मंदिरे,विहिरी,तलाव,शेती,वाडी,सरपणासाठी मुबलक लाकूड फाटा, मीठ, मासे, भात,नाचणी,वरी,तीळ, आंबे, काजू, चिंच, बोरे, फणस,कलिंगड,रांजने,सायरे,शेवग्याच्या शेंगा,गवत विकणे, सर्व प्रकारचा भाजी पाला, कोंबड्या, बदके, शेळ्या,गायी,म्हैशी वगैरे वगैरे जिवीत जगण्याचे हमिचा अन्न साठा आणि पिढीजात रोजगार होता.पिढ्यान पिढ्या सुखी समाधानाने जिवन जगत होते.
शासनाने  २१ जून   १९८४ च्या अधिसुचनेने सन १९८६ साली शेवा कोळीवाडा गावाचे  ७.२१ हेक्टर गावठाण विनामूल्य  संपादून JNPT च्या  दुसऱ्या टप्यासाठी दिले होते.प्रकल्प बाधित शेवा कोळीवाडा गावठाणातील शेतकरी/बिगर शेतकरी एकूण ६२०  कुटुंबांचे दि.१२/११/१९८२ ते १५/०१/१९८८ मध्ये पायरी पायरीने शासनाचे माप दंडाणे ३३.६४ + १७.०२ हेक्टर जमीनीवर  पुनर्वसन मंजूर केले होते. तहसिलदार उरण यांनी दि.१५/०१/२०२५ रोजी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण यांना दिलेल्या अहवालात JNPT ने पुनर्वसनासाठी फक्त १६ लक्ष ९० हजार रुपये फंड दिला  होता. त्या रक्कमेत १७ हेक्टर शेत जमिनी पैकी २ हेक्टर शेत जमीन विकसित केली होती.उर्वरित शिल्लक राहीलेले शेत जमीनीचे  बांध   समुद्राचे भरती – ओहोटीचे क्रियेणे फुटून/तुटून कांदळवन झाले होते.हा गुन्हा तहसिलदार उरण यांनी कबूल करूनहि  वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण यांनी त्यांच्यावर एफ आय आर नोंदवून पुनर्वसन फसवणूक,ठकवणूक केल्याचा तपास केलेला नाही.जिल्हाधिकारी रायगड यांनी  दि.०८/१२/२०२५ रोजी शासनाला दिलेल्या अहवालात  मौजे बोरीपाखाडी, उरण येथील १७ .०२ हेक्टर जमीन दिल्याची कबुली दिलेली आहे.त्या पैकी  हनुमान कोळीवाडा गावासाठी २ हेक्टर क्षेत्रा पैकी ०.९१.२४ हे. आर. क्षेत्र प्रकल्पग्रस्तांना घरांच्या बांधकामासाठी देण्यात आले. ती जागा अपुरी आहे.त्यामुळे त्यांच्या वैयक्तिक,सामाजिक,आर्थिक व आरोग्य या बाबिवर परिणाम झाला आहे. आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ४ (१)ची  दि. १२/०३/१९८७ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात  हनुमान कोळीवाडा  महसुली गावाची प्रसिध्द केलेली अधिसूचना रद्द न करता १७ .०२ हेक्टर जमिनी पैकी  शिल्लक असलेली  १५ हेक्टर पुनर्वसनाची जमीनीत कांदळ वन झाल्याने ती जमीन दि.२८/०९/२०२२ रोजीच्या अधिसूचनेने वन विभागाला दिलेली आहे. जिल्हाधिकारी रायगड यांनी शेवा कोळीवाडा,उरण,रायगड या गावाचे गेल्या ४० वर्षात पुनर्वसन केलेले नाही त्याचा शासनाला दिलेला  हा कबुली जबाबआहे. केंद्र सरकारचे बंदरे मंत्रालयाने दि.१६/०९/२०२५ रोजी मौजे जसखार व फुंडे गाव नकाशातील जेएनपीएची विकसित जमीन  मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य यांना शेवा कोळीवाडा गावातील २५६ कुटुंबाना दिलेली आहे.आणि त्या जमिनीची किंमत देण्याची मागणी शासनाकडे केलेली होती. उप सचिव  (पुनर्वसन),महसूल व वन विभाग,यांनी दि.२३/०३/२०२६ रोजी NSPT प्रकल्प बाधित शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी एकूण २५६ कुटुंबांचे दि.१२/११/१९८२ ते १२/०३/१९८७ मध्ये पायरी पायरीने शासनाचे माप दंडाणे मंजूर असलेले पुनर्वसनाची जबाबदारी जेएनपीएची आहे. मौजे जसखार व फुंडे गाव नकाशातील पूनर्वसनाचे जमिनीची  किमत रुपये २५,५६,४७,५०७/- (रुपये पंचवीस करोंड छप्पन लक्ष सतेचाळीस हजार पाचशे सात मात्र) रक्कम इतकी आहे. ती रक्कम केंद्र सरकारचे बंदरे मंत्रालयाने जेएनपीए कडून वसूल करावी.असे केंद्र सरकारचे बंदरे मंत्रालयाला कळविलेले आहे. JNPA ने त्यांनी  दिलेल्या जमिनीचे सीमांकन व गवत काढणेचे टेंडर  दि.२७/०१/२०२५ रोजी काढले होते.पण JNPA ने कामाचा ठेका ठेकेदारस देवून काम करून घेतलेले नाही. शेवा कोळीवाडा गावातील शेतकरी/बिगर शेतकरी एकूण २५६ कुटुंबांचे दि.१२/११/१९८२ ते १२/०३/१९८७ मध्ये पायरी पायरीने शासनाचे माप दंडाणे मंजूर असलेले १७.०२ हेक्टरवारील पुनर्वसनाची जबाबदारी जेएनपीएची आहे. त्या साठी लागणाऱ्या   फंडाची मंजूरी केंद्र सरकार देत नाही . मात्र  जेएनपीएने गरज नसताना गावठाण मागून ४० वर्षा नंतर  त्या पडीत शेवा मूळ गावठाणातील मंदिरांचा जीर्णोद्वार व उद्यानाची कामे M/s GREENLAND, MUNBAI यांना रुपये ७,७४,९७,६७२.९६/- रक्कमेचे कामाचा  ठेका दिलेला आहे.आणि M/s PAINTERIOR PROTECTIVE SYSTEMS LLP, MUNBAI यांना रुपये ५,३९,०६,४२७.३०/- रक्कमेचे कामाचा  ठेका दिलेला आहे. त्यां दोन्ही ठेकेदारांची  पडीत शेवा मूळ गावठाणात कामे चालू आहेत.त्या एकूण रुपये १३,१४,०४,१००/- रक्कमेची मंजूरी जेएनपीए व्यवस्थापनाने केली आहे.म्हणून शेवा कोळीवाडा विस्थापितांनी गेली ४० वर्षात पुनर्वसन फसवणूक व ठकवणूक गुन्हेबाबतची चौकशी  विशेष तपास पथक (Special Investigation Team (SIT)  मार्फत तपास करण्याची मागणी केली आहे.

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन !;

उरण येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ; नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन !

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : उरण पोलीस ठाणे हद्दीतील जांभुळपाडा, जासई येथील ४३ वर्षीय फिरस्ता इसम करण लक्ष्मण सिंग याचा सायन हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे आवाहन उरण पोलिसांनी केले आहे. पोलीस ठाणे उरण येथे अकस्मात मृत्यु रजि. नं. २१/२०२६ भा.ना.सु. संहिता कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबर देणार पंढरीनाथ वामन पाटील, वय ५२, रा. वंशेणी, ता. उरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत करण लक्ष्मण सिंग याला १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास राहत्या गावाजवळ चक्कर येऊन तो पडला व त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर त्याला तातडीने यमुनाबाई रुग्णालय, चिर्ले येथे प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मनपा हॉस्पिटल, वाशी येथे हलवण्याचा सल्ला दिला. वाशीत उपचार घेतल्यानंतर २७ जानेवारी २०२६ रोजी रात्री १.३० वाजता त्याला सायन हॉस्पिटल, मुंबई येथे दाखल करण्यात आले. सायन हॉस्पिटलच्या वॉर्ड नं. ०५ मध्ये त्याच्यावर औषधोपचार सुरू असताना १९ मार्च २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजता कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयताचे वय अंदाजे ४३ वर्षे, उंची ५ फूट ४ इंच, केस काळे-पांढरे असून तो फिरस्ता होता व जांभुळपाडा, जासई येथे राहत होता. या प्रकरणाचा तपास पोहवा सचिन दत्तात्रेय पाटील करत असून दाखल अधिकारी सपोनि सतिश गोरे आहेत. मयताच्या नातेवाईकांचा अद्याप शोध लागलेला नसल्याने उरण पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, करण लक्ष्मण सिंग याच्या नातेवाईकांबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी उरण पोलीस ठाणे दूरध्वनी क्र. ९५५२५९८९७७७ किंवा तपास अधिकारी पोहवा सचिन पाटील यांच्याशी संपर्क साधावा.सदर व्यक्तीचे मार्च मध्ये निधन झाले तरी त्याच्या नातेवाईकांचा अजूनही शोध लागला नाही म्हणून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून मयताच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांनी सहकार्य करावे, अशी विनंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे यांच्या मार्फत करण्यात आली आहे.

पुण्यातील ४ वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी पत्रकार उत्कर्ष समितीची नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी...

पुण्यातील ४ वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी पत्रकार उत्कर्ष समितीची नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी...

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) :
 पुणे शहरात ६४ वर्षीय वृद्ध नराधमाने केवळ ४ वर्षांच्या निरागस मुलीवर अमानुष बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानवीय, क्रूर व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ उरण तालुक्यातील सुजाण नागरिकांच्या वतीने ‘पत्रकार उत्कर्ष समिती’ मार्फत उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. सदर नराधम आरोपीचा खटला ‘फास्ट ट्रॅक न्यायालयात’ चालवून ६ महिन्यांत निकाल लावत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.  

निवेदनात म्हटले आहे की, ४ वर्षांची चिमुकली, जिचे जग पाहणेही सुरू झाले नव्हते, तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करून तिचे जीवन संपवणारा नराधम माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पालकांच्या मनात प्रचंड भीती व संतापाची लाट उसळली आहे.  

आरोपीला फाशी झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल व अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ व कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

उरणच्या तहसीलदारांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन ते मा. जिल्हाधिकारी, रायगड व मा. गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे तात्काळ पाठवून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ‘पत्रकार उत्कर्ष समिती’च्या वतीने पूजा चव्हाण यांनी केली आहे.  

या घटनेमुळे उरण तालुक्यातही संतापाची लाट पसरली असून, “जग पाहण्याआधीच चिमुकलीचा बळी घेणाऱ्या नराधमाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नकोच,” अशी एकमुखी मागणी नागरिकांमधून होत आहे.


निवेदनातील प्रमुख मागण्या : 

१. सदर खटला ‘फास्ट ट्रॅक न्यायालयात’ चालवून ६ महिन्यांच्या आत निकाल लावण्यात यावा.  

२. आरोपीला भारतीय न्याय संहिता व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत कठोरात कठोर, म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील नेमावा.  

३. पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानसिक मदत शासनामार्फत देण्यात यावी.  

४. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही व पोलीस गस्त वाढवण्यात यावी

Friday, 8 May 2026

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !!

ऐरोली-काटई फ्रीवेचे उर्वरित काम दृष्टीपथात: भूसंपादनाची प्रक्रिया सुरु !!

*कल्याण, प्रतिनिधी*

मुंबई फ्रीवेच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या आणि नवी मुंबई ते डोंबिवली अंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांवर आणणाऱ्या *ऐरोली-काटई मुक्त मार्गाच्या* उर्वरित कामाला गती मिळणार आहे.

*भूसंपादनाची प्रक्रिया सुरु*  
ठाणे महापालिका क्षेत्रातील या मार्गाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस जाहीर केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

*18.33 हेक्टर जागा आवश्यक*  
उर्वरित कामासाठी देसाई गाव 10.3 हेक्टर, डावले 4.92 हेक्टर, शीळ 2.12 हेक्टर, कौसा 0.57 हेक्टर, डोखाळ 0.42 हेक्टर अशा एकूण *18.33 हेक्टर जमिनीचे* भूसंपादन होणार आहे. ही जागा खुली असल्याने कोणाचेही विस्थापन किंवा पुनर्वसनाचा प्रश्न उद्भवणार नाही.

*प्रकल्पाचा आढावा*  
*एकूण लांबी*: 12.71 किमी, 3+3 लेन कॅरेजवे  
*टप्पा I*: ठाणे-बेलापूर रोड ते NH-04, लांबी 3.43 किमी. यात 1.69 किमीचा दुहेरी बोगदा व 0.94 किमी उन्नत मार्ग. नागरी कामे 92 टक्के पूर्ण.  
*टप्पा II*: ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोड, लांबी 2.57 किमी. काम 100 टक्के पूर्ण.  
*टप्पा III*: NH-04 ते काटई नाका, लांबी 6.71 किमी. काम 10 टक्के पूर्ण. पूर्णत्वाचे लक्ष्य ऑक्टोबर 2028.

*मुख्य फायदे*  
*अंतरात बचत*: मुलुंड ते काटई नाका दरम्यान 7 ते 8 किमी अंतराची बचत.  
*वेळेत बचत*: प्रवासाचा वेळ 30 ते 45 मिनिटांनी कमी होणार.  
*वाहतूक कोंडी कमी*: ऐरोलीतील अंतर्गत रस्ते, ठाणे-बेलापूर रोड, महापे रोड, शिळफाटा जंक्शन, कल्याण फाटा व कल्याण-शीळ रोडवरील ताण कमी होईल.

खासदार डॉ. शिंदे यांच्या पुढाकाराने मेट्रो 12, मेट्रो 5 चा विस्तार, उड्डाणपूल, सॅटिस यांसारखे मेगा प्रकल्प कल्याण लोकसभा मतदारसंघात राबवले जात आहेत. ऐरोली-काटई फ्रीवे पूर्ण झाल्यावर प्रादेशिक संपर्क अधिक सुलभ होऊन लाखो नागरिकांचा दैनंदिन प्रवास वेगवान होणार आहे.

दहावीचा निकाल 92.09 टक्के: कोकण विभाग सलग अव्वल, मुलींची पुन्हा बाजी !!

दहावीचा निकाल 92.09 टक्के: कोकण विभाग सलग अव्वल, मुलींची पुन्हा बाजी !!

*मुंबई, दि. 15 मे 2026*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. यंदाही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

*राज्याचा निकाल 92.09 टक्के*  
यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला आहे. राज्यभरातून लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी *14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी* यशस्वी झाले आहेत. निकाल जाहीर होताच विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

*कोकण विभाग सलग अव्वल*  
विभागनिहाय निकालात कोकण विभागाने सलग उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. कोकण विभागाचा निकाल *97.62 टक्के* इतका नोंदवला गेला. तर छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी *88.41 टक्के* लागल्याची माहिती मंडळाने दिली.

*मुलींची पुन्हा सरशी*  
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात आपली सरशी कायम ठेवली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का *94.96* इतका नोंदवण्यात आला असून, मुलांचा निकाल *89.56 टक्के* लागला आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत *5.40 टक्क्यांनी अधिक* ठरला आहे. शिक्षण क्षेत्रात मुली सातत्याने पुढे येत असल्याचे चित्र या निकालातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

*पुढील वाटचालीला सुरुवात*  
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तयारी सुरू केली आहे. अनेक विद्यार्थ्यांसाठी हा निकाल भविष्यातील करिअरची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राज्यभरात आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्साह, आनंद आणि नव्या स्वप्नांची सुरुवात ठरत आहे.

Thursday, 7 May 2026

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सैतवडे बलभिमवाडी येथे 10 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन !!

लॉर्ड बुद्धा फाऊंडेशन (कला, क्रीडा, आरोग्य, शिक्षण, समता) सैतवडे, बलभिमवाडी, ता. जि. रत्नागिरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन  रविवार दिनांक १० मे रोजी रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी रात्री ०९:०० वाजता लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स, त्यानंतर सभा, सत्कार आणि जीवन गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी  दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक व  महाराष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. विलासराव कोळेकर  यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच  "हा छंद प्रियेचा" हा नाट्यप्रयोग रात्री ठीक १०:३० वाजता आयोजित केला आहे.  लोकप्रिय दिग्दर्शक, प्रसाद धोपट व रणरागिणी ताराराणी नाटक फेम, स्टार प्रवाह वरील 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेमधील 'पूजा' अभिनेत्री 'ज्योती निमसे आदी नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. या सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन लॉर्ड बुद्धा फाउंडेशन सैतवडे बलभिमवाडी यांनी केले आहे. न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचे भव्य पटांगणात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

सौजन्य/ वृत्त - विलासराव कोळेकर सर 

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय.

सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; उरण तालुक्यातील विंधणे वशेणी वेश्वी येथील जमीनीची जाहिरातबाजी.

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : 
उरण तालुक्यातील मोकळे भूखंड विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १५ गुंतवणूकदारांकडून तब्बल ५७ लाख ३६ हजार रुपये उकळले आहे . त्यांना प्लॉट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी बेलापूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तेजस डाकी व त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणातील टोळीने जून २०२२ मध्ये सीबीडी परिसरात मे. लैंडलॉर्डस् रिअलटर्स या कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी उरण तालुक्यांतील विंधणे , वशेणी व पुनाडे या भागातील मोकळे प्लॉट विकत देण्याची जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीकडे धाव घेतली. आरोपींनी या गुंतवणूकदारांकडून प्लॉटच्या मोबदल्यात मोठी रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी प्लॉटचा दिला नाही आणि गुंतवणूकदारांचे पैसेही परत केले नाहीत.त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठया प्रमाणात फसवणूक झाली.

या प्रकरणात फसवणूक झालेल्यांमध्ये पुष्करसिंग रावत याच्यासह प्रवीण चंदनशिव, प्रदीप भाटकर, सुनील वाडकर, कांतीलाल पटेल, गौरव वरसोलकर, राजिंदर सिंग, हफिज अन्सारी, मनोज होळकर, नानी मंडल, तुकाराम ढेपे, सचिन शहाणे, सुनील शेट्टी व इतरांचा समावेश आहे. या सर्वांना मिळून ५७लाख ३६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून या १५ गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.आर्थिक फसवणूक करून खोट्या जमीन खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्या उरण तालुक्यात सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे

संग्राम तोगरे आदिवासी वाडीला आनंद देणारा एक मोठ्या मनाचा माणूस - साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

संग्राम तोगरे आदिवासी वाडीला आनंद देणारा एक मोठ्या मनाचा माणूस - साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील

उरण दि ७, (विठ्ठल ममताबादे) : समाज सेवेचे व्रत अंगी घेतलेले कवी संग्राम तोगरे हे मागील कित्येक वर्षांपासून विविध ठिकाणच्या डॉक्टरांकडे शिल्लक राहिलेली आणि गरीब पेशंटना उपयुक्त ठरणारी औषधे गोळा करून योग्य जागी पोहोचविण्यात तोगरे सतत सेवा करीत राहिले आहेत.ते सेवेचे व्रत करतांना त्यांनी काही दात्यांकडून धान्य, डाळ, कपडे गोळा करून गरजूंना दिले आहे. यावेळी आपल्या  ७९ व्या वाढदिवशी तेली पाडा ( मुळेखंड ) येथील नव्या आदिवासी वस्तीवर जाऊन ४० घरकुलांना वरील वस्तूंचे वाटप केले , त्यामुळे वाडीला आनंद देणारा एक माणूस आहेत असा विचार साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल बी पाटील यांनी वाटप प्रसंगी उपस्थितांसमोर मांडला.

दाते चंद्रकांत ठक्कर यांनी ही संग्राम यांचे विषयी गौरवोद्गार काढून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजसेवेत मदत करणा-या संग्राम यांच्या पत्नी सुमन तोगरे, कार्यकर्ते रवी काटे (केगांव), नक्षत्रा संग्राम, उमाजी लक्ष्मण पवार इत्यादी प्रमुखांची उपस्थिती होती. वाडीवरच्या तेथील उपस्थितांनी संग्राम तोगरे दांपत्याला भरभरून सदिच्छा दिल्या.

जेएनपीए येथील सर्व पाच कंटेनर टर्मिनल्स सुरळीतपणे कार्यरत असून कोणतीही गर्दी किंवा अडथळा नसताना पूर्ण कार्यक्षमतेने सेवा सुरू !!

जेएनपीए येथील सर्व पाच कंटेनर टर्मिनल्स सुरळीतपणे कार्यरत असून कोणतीही गर्दी किंवा अडथळा नसताना पूर्ण कार्यक्षमतेने सेवा सुरू !!

उरण दि 7, (विठ्ठल ममताबादे) :
जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (जेएनपीए )भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर, सीएफएसएआय (CFSAI) आणि बीसीबीए (BCBA) यांनी नुकत्याच जारी केलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर आपल्या कंटेनर टर्मिनल्सच्या कार्यान्वयन स्थितीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.जेएनपीए येथील सर्व पाच कंटेनर टर्मिनल्स सुरळीतपणे कार्यरत असून कोणतीही गर्दी किंवा अडथळा नसताना पूर्ण कार्यक्षमतेने सेवा सुरू आहेत. दररोज सरासरी 10 ते 12 कंटेनर जहाजे जेएनपीएमध्ये दाखल होत असून, आयात-निर्यात मिळून सुमारे 22,000 टीईयू कंटेनर मालाची हाताळणी केली जात आहे. गेट ऑपरेशन्सदेखील स्थिर असून, दररोज सुमारे 20,000 टीईयू मालाची रस्तेमार्गे तर 2,000 टीईयू मालाची रेल्वेमार्गे वाहतूक केली जात आहे.

गर्दीबाबत करण्यात येत असलेल्या दाव्यांच्या विपरीत, बंदरातील कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरळीत सुरू आहे. सध्याची अडचण ही बंदर टर्मिनल्समध्ये नसून, कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) आणि कस्टम ब्रोकर्स (सीबी) यांच्याकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ट्रेलर्स आणि चालकांच्या कमतरतेमुळे निर्माण झाली आहे.

टर्मिनल यार्डमध्ये ठेवण्यात आलेले आयात कंटेनर्स हे सीएफएस किंवा सीबी यांच्याकडून ट्रेलर्स उपलब्ध करून दिल्यानंतरच वितरित केले जातात. पुरेशा संख्येने ट्रेलर्स उपलब्ध करून देणे ही त्यांची जबाबदारी आहे. सुट्ट्या किंवा अनुपस्थितीमुळे चालक उपलब्ध नसल्यास, पर्यायी व्यवस्था तातडीने करणे आवश्यक आहे.

कंटेनर वितरण प्रक्रिया जलद करण्यासाठी टर्मिनल्सकडून अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. लोडिंगसाठी ट्रेलर्स प्रतीक्षेत असल्याची कोणतीही परिस्थिती नाही. उलट, चालकांच्या कमतरतेमुळे टर्मिनलमध्ये येणाऱ्या ट्रेलर्सची संख्या कमी झाली आहे.

जेएनपीएकडून करण्यात येत असलेल्या सक्रिय उपाययोजना करण्यात येत आहे  यात रेल्वे सायडिंग असलेल्या जवळील सीएफएस पर्यंत कंटेनर्सची रेल्वेमार्गे जलद वाहतूक सुलभ करणे. मंजुरी प्रक्रियेला गती देण्यासाठी सीमाशुल्क विभागाशी समन्वय साधणे. सध्या सुट्टीवर असलेल्या चालकांना परत आणण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश येथून विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करून व्यापार क्षेत्राला सहाय्य करणे.या गोष्टीचा समावेश आहे .

जेएनपीएची एकूण कंटेनर साठवण क्षमता 1.76 लाख टीईयू इतकी आहे. सामान्य परिस्थितीत ऑक्युपन्सी 90,000 ते 1,00,000 टीईयू दरम्यान असते. मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीमुळे ट्रान्सशिपमेंट कार्गोमध्ये वाढ झाल्याने 7 मे 2026 रोजी ऑक्युपन्सी 1.18 लाख टीईयू इतकी नोंदविण्यात आली असून, ती एकूण क्षमतेच्या केवळ 67% आहे. यापैकी फक्त 26,000 टीईयू हे ट्रान्सशिपमेंट कंटेनर्स असून, त्यामुळे कोणतीही गर्दी निर्माण झालेली नाही. ऑक्युपन्सीमध्ये झालेली वाढ ही केवळ सीएफएस आणि सीबी यांच्याकडून ट्रेलर्सच्या उपलब्धतेत झालेल्या विलंबामुळे आहे.असे जेएनपीए ने सांगितले.

जेएनपीए पुन्हा एकदा स्पष्ट करत आहे की, बंदरातील कामकाजात कोणतीही गर्दी किंवा अडथळा नाही. मात्र, आयात कंटेनर्सची प्रलंबित स्थिती दूर करण्यासाठी सीएफएस आणि कस्टम ब्रोकर्स यांनी तातडीने पुरेशा संख्येने ट्रेलर्स आणि चालकांची उपलब्धता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. जेएनपीए सर्वतोपरी सहकार्य करण्यास सज्ज आहे; तथापि, कंटेनर्सच्या वाहतूक व निकासीची प्राथमिक जबाबदारी सीएफएस आणि सीबी यांच्यावरच आहे.

“जेएनपीए आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे. टर्मिनल यार्डमधून आयात कंटेनर्सची सुरळीत निकासी सुनिश्चित करण्यासाठी सीएफएस आणि कस्टम ब्रोकर्स यांनी तातडीने पुरेशा संख्येने ट्रेलर्स आणि चालकांची व्यवस्था करावी, असे आम्ही आवाहन करतो.” असे जेएनपीए प्रशासनाने एका प्रसिद्धीपत्रका द्वारे सांगितले आहे

Wednesday, 6 May 2026

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!

पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!

मुंबई, प्रतिनिधी : दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी आर्यारवी एंटर टेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय लघुपट महोत्सवचे (वर्ष ४ थे) आयोजन शिरोडकर हायस्कूल -परेल, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात  कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना रंगकर्मी, कलाभूषण, समाजभूषण असे पुरस्कार दिले गेले. 

याच कार्यक्रमात पत्रकार पंकजकुमार पाटील यांना "समाजभूषण" देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास मुख्य आयोजक, अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर तेटंबे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश पुळेकर, ज्येष्ठ गायक व  गझल नवाझ भीमराव पांचाळे, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक के. राघवकुमार , ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर (आप्पा )तोडणकर, ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक गुरुनाथ तिरपणकर, ऍड. सुनिल शिर्के, अभिनेत्री सिद्धी कामत व इतर मान्यवर उपस्थित होते. 

तसेच १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ वृत्तपत्र लेखक मधु शिरोडकर यांच्या 'कालप्रवाह' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मामा काणे हाॅटेल सभागृह, दादर (पश्चिम ), मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 'कालप्रवाह' या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री उदय देशपांडे, दै.नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, माजी संपादक प्रकाश कुलकर्णी संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी विविध वृत्तपत्रलेखक, पत्रकार यांना निर्भीड जागल्या पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

सदर कार्यक्रमात पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पंकजकुमार यांना दिलीप दळवी पुरस्कृत, "निर्भीड जागल्या" पुरस्काराने गौरवण्यात आले. 

कांजूरमार्ग मुंबई येथील पत्रकार तसेच आदर्श वार्ताहर या पाक्षिक वृत्तपत्र व न्यूज पोर्टल चे संपादक पंकजकुमार पाटील गेली २० वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता करीत आहेत. विविध वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा, राजकीय व इतर विषयांवर वृत्तपत्रलेखन केले आहे. तसेच विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना ते बातम्यामधून प्रसिद्धी देत  असतात. तसेच गेली सहा वर्षे स्वतःचे आदर्श वार्ताहर पाक्षिक नित्यानियमाने मेहनतीने, हिमतीने प्रकाशित करीत आहेत.या आधी त्यांना वेगवेगळ्या पत्रकार संस्था, संघटना यांच्याकडून आदर्श व उत्कृष्ट पत्रकार यासह इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

२०२६ वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पत्रकारदिनी त्यांना  उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आता मिळालेल्या दोन वेगळ्या  पुरस्काराबद्दल  त्यांचे नातलग, मित्रपरिवार, पत्रकार बांधव, समाजातील मान्यवर व्यक्ती यांच्याकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात  आहे.

Tuesday, 5 May 2026

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!


उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि रस्त्यांवरील शिस्तीसाठी नवी मुंबई पोलीस, उरण वाहतूक शाखेने सम-विषम तारीख पार्किंग पद्धत लागू केली आहे. उरण नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूला सम आणि विषम तारखांचे पार्किंग बोर्ड लावण्यात आले असून नागरिकांनी त्यानुसारच वाहने पार्क करावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक, उरण वाहतूक शाखा यांनी केले आहे. 

नव्या नियमानुसार, ज्या ठिकाणी सम तारखांचे म्हणजेच २, ४, ६, ८, १०, १२, १४, १६, १८, २०, २२, २४, २६, २८, ३० या तारखांचे बोर्ड लावले आहेत, तिथे फक्त त्या सम तारखांनाच वाहने पार्क करता येतील. तर जिथे विषम तारखांचे म्हणजेच १, ३, ५, ७, ९, ११, १३, १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९, ३१ या तारखांचे बोर्ड लावले आहेत, तिथे फक्त त्या विषम तारखांनाच पार्किंगची परवानगी असेल. या बोर्डांशिवाय इतर ठिकाणी किंवा चुकीच्या दिवशी वाहन पार्क केल्यास मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. 

उरण शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बेशिस्त पार्किंगमुळे आपत्कालीन वाहने, बस आणि रुग्णवाहिकांना मार्ग मिळणे कठीण होत होते. ही समस्या लक्षात घेऊन उरण नगरपालिका व वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला आहे. सम-विषम पार्किंगमुळे रस्त्याच्या एकाच बाजूला वाहने लागतील व दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोकळी राहील, त्यामुळे कोंडी कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, जेणेकरून उरण शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित होईल, असे आवाहन उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे

श्रावणी ठाकूरचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

श्रावणी ठाकूरचे महेंद्रशेठ घरत यांनी केले अभिनंदन !!

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) :
बेलपाडा येथील श्रावणी संतोष ठाकूर हिने रोटरी इंग्लिश मिडीयम हायस्कूल आणि ज्युनियर सायन्स आणि कॉमर्स कॉलेज, बोरी, उरण येथे बारावी वाणिज्य शाखेत पहिला क्रमांक मिळविला आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश संपादन केले आहे. सोमवारी (ता. ४) तिने आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी तिचे मनापासून अभिनंदन केले, तिचा शाल आणि पुस्तके भेट देऊन सन्मान केला. यावेळी तिची आजी सरिता ठाकूर, संतोष ठाकूर उपस्थित होते. "शैक्षणिक क्षेत्रांत उत्तुंग भरारी घे, पुढील शिक्षणासाठी शक्य ते सहकार्य मी करणार, तू फक्त अभ्यास कर," असे महेंद्रशेठ घरत यांनी श्रावणी ठाकूर हिला आश्वासित केले.

सरिता ठाकूर यांची दुसरी नात गौरी दर्शन ठाकूर हिला महेंद्रशेठ घरत यांनी दत्तक घेतले आहे. गेली तीन वर्षे तिचा सर्व खर्च महेंद्रशेठ घरत करीत आहेत. यावेळी सरिता ठाकूर म्हणाल्या, "महेंद्रशेठ घरत यांच्यासारखा देवदूत आमच्यासोबत आहे. नाही तर मला धुणी-भांडी करून घर चालवावे लागले असते. केवळ महेंद्रशेठ घरत यांच्यामुळेच आम्ही सुखाने जगतोय. माझ्या गौरीला तीन वर्षांत काहीही कमी पडले नाही. आता दुसऱ्या नातीलाही ते शिक्षणासाठी मदत करणार आहेत. त्यांचे मी आभार कसे मानू समजत नाही, परमेश्वर महेंद्रशेठ घरत यांना सतत हसतमुखानेच ठेवू दे," अशी मी देवाजवळ प्रार्थना करीत आहे.

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !! *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव...