Wednesday, 8 April 2026

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त एका वाहनावर, ग्रामस्थांमधून आचर्य व्यक्त !!

भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त एका वाहनावर, ग्रामस्थांमधून आचर्य व्यक्त !!

** महसूल विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह 

भिवंडी, दिं,८,अरुण पाटील (कोपर)
सद्या भिवंडी तालुक्यातील खाडी पत्रातून दररोज दिवसा - रात्री बेकायदेशीर रित्या लाखो ब्रास रेती उत्खनन होऊन तिची शेकडो हायवा डंपरमधून हजारो ब्रास रेती बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असून त्या पैकी बुधवार दिं,१/४/२०२६ रोजी तलाठी सजा कोपर येथील मा.तलाठी श्री.रमेश रामराव सूर्यवंशी यांनी आपल्या महसूल पथकासह एका बेकायदेशीरीत्या "रेती" ची चोरटी वाहतूक करणाऱ्या टाटा  हायवा ट्रक वर कारवाई करत नारापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती तलाठी कोपर यांनी दिली आहे. मात्र याच ठिकाणावरून दररोज शेकडो हायवा डंपर मधून हजारो ब्रासची रेतीची चोरटी वाहतूक हात असताना फक्त एकाच वाहनावर कारवाई केल्याने ग्रामस्थांमधून आचर्य व्यक्त होत असून महसूल खात्या विरोधात आर्थिक व्यवहाराचा संशय बळावत आहे.

      सविस्तर हकिगत अशी की, भिवंडी तहसीलदार श्री.अभिजीत खोल यांनी मा. जिल्हाधिकारी ठाणे ,श्री.कृष्णा पांचाळ साहेब, मा.अप्पर जिल्हाधिकारी- ठाणे श्री हरिचंद्र पाटील साहेब, उपविभागीय अधिकारी, श्री सानप साहेब यांच्या आदेशाचे पालन करत दिं,२०/०३/२०२६ रोजी केवणी (दिवे)खाडी किनारी छापा टाकून येथील बार्ज, सक्शन पंप,असा एकूण ४० ते ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता.

           मात्र त्याच दिवसापासून पुन्हा त्याच ठिकाणावरून बेकायदेशीर रित्या रेती उत्खनन व रेती वाहतूक सुरळीत सुरू आहे.या बाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी मंडळ अधिकारी - खारबाव व तलाठी सजा - कोपर यांना दिली होती. मात्र त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्याने या  कालावधी दरम्यान महसूल खात्याचे  रेती या गौण खनिज रूपाने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे व होत आहे, त्याला जबदार कोण? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.त्यामुळे महसूल खात्याने या गंभीर विषयाकडे जातीने लक्ष केंद्रित करून दररोज  शासनाचा" स्वामित्व धन" रूपाने महसूल चोरी करणाऱ्यांनवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची.मागणी जोर धरू लागली आहे.

         तलाठी सजा - कोपर चे तलाठी श्री मा. श्री.रमेश सूर्यवंशी यांनी दिं,१/४/२०२६ रोजी संध्याकाळी ७.३० वा. आपल्या पथकातील सहकारी मनोज नवले ग्राम महसूल अधिकारी - पालखाने, रुपेश कारभारी - जुनांदुर्खी, किसान हांबीर - ग्राम महसूल अधिकारी चिंबिपाडा, या पथकासह कोपर गावातील दोस्ती ग्रेटर - ठाणे येथे गस्त घालत असताना त्यांना केवणी (दिवे) गावाकडून भिवंडी - ठाणे मुख्य रस्त्याकडे रीतीने भरलेला हायवा ट्रक क्रं. एम.एच.४६- सी.यू.९३७२) जात असताना दिसला त्यावेळेस चालकाला गाडी थांबवण्यास सांगून आम्ही आमची ओळख सांगून रेती बाबत रॉयल्टी/परवाना काही कागद पत्रे असल्या बाबत विचारणा केली असता ट्रॅक चालक मनोज याने कोणतेही कागद पत्रे नसल्याचे सांगुन पळून गेला.

        नंतर नारपोली पोलिसांनी बेकायदेशीर रेती चोरी प्रकरणी महाराष्ट्र जमीन महसुल संहिता, व भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करून १५ लाख १५ हजार रु. किंमती ट्रक सह मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा अधिक तपास नारपोली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक धनराज केदार करत आहे.

         या कारवाई नंतर देखील वाळू /रेती माफिया यांनी महसूल खात्याला फाट्यावर मारत रेती उत्खनन व वाहतूक सुरू ठेवली आहे.तेंव्हा या बाबतची माहिती उप जिल्हाधिकारी  रुपाली भालके मॅडम यांना मिळाली असता त्यांनी सोमवार‌,दीं ६/४/२०२६ रोजी दुपारी अचानक छापा टाकून त्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या  साठवणूक केलेली १५ कुंड्यांन मधून ४५० ब्रास रेती साठा जप्त केला आहे. यापुढे आता अश्या वाळू माफियांवर गुप्त बातमीदारामार्फत त्यांची नावे शोधून काढून त्यांच्यावर "मोकोका"च्या कायद्यात तरतूद असेल तर तो लावणार अथवा विविध कलमा खाली विविध गुन्हे दाखल करणार असल्याचं संकेत श्रीमती रुपाली भालके मॅडम यांनीं दिल्याने या वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

No comments:

Post a Comment

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !! *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव...