Thursday, 15 May 2025

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेकडून कामगारांना घरगुती भांड्यांचा संच वाटप !!

*कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने उपक्रमाचे आयोजन, कामगार नोंदणीचे गौतम बरडे यांचे आवाहन**

कल्याण, (संदीप शेंडगे) :
ता. १४ मे — टिटवाळा येथे महाराष्ट्र राज्य असंघटित बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कल्याण तालुक्यातील २५० महिला व पुरुष बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक अशा भांड्यांचा संच भेट म्हणून वाटप करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.

या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौतम बरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कामगारांनी शासनाच्या विविध लाभ योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटित कामगारांनी त्यांची नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. “नोंदणी झालेल्या कामगारांनाच शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळतो. अनेक योजना कामगारांसाठी आहेत अनेक फायदे कामगारांना होत आहेत त्यामुळे अधिकाधिक बांधकाम कामगारांनी पुढे येऊन नोंदणी करावी,” असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात २५० बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनंदिन उपयोगासाठी आवश्यक असलेले स्टीलचे भांडे संच वाटप करण्यात आले. यामध्ये तांब्या, वाटी, ताट, वाटप्या, डबे इत्यादींचा समावेश होता. उपस्थित कामगारांनी या मदतीबद्दल आनंद व्यक्त केला व संघटनेचे आभार मानले.

हा उपक्रम म्हणजे केवळ वस्तूंचे वाटप नसून, कामगारांच्या आयुष्यातील एक सकारात्मक पाऊल ठरला असून, भविष्यात असेच विविध उपक्रम राबवून कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे गौतम बरडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्याध्यक्ष प्रवीण तायडे सौरव बरडे खजिनदार केशव पाटील सचिव माया बरडे दीपक ओवाळ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठेकेदार शिवाजी देशमाने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...