Saturday, 2 May 2026

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

मांडा–टिटवाळा येथे हिंदू संमेलन उत्साहात संपन्न !!

कल्याण (टिटवाळा), संदीप शेंडगे :

मांडा–टिटवाळा (पूर्व) येथील विद्यामंदिर शाळा पटांगणात आयोजित हिंदू संमेलन उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले. हिंदू समाजातील विविध घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा  वाढवली.

या संमेलनात प्रमुख वक्त्या म्हणून यशोदाताई पाटील आणि हर्षदाताई केणे यांनी बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितीवर सखोल भाष्य केले. आपल्या हिंदू परंपरेचा आणि महापुरुषांचा दैदिप्यमान इतिहास त्यांनी उपस्थितांसमोर  मांडला त्यांनी विशेषतः मुलींना लक्ष्य करून होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली. "लव्ह जिहाद" आणि "लँड जिहाद" सारख्या मुद्द्यांवर बोलताना त्यांनी मुलींनी सावध राहावे, कोणत्याही आंधळ्या प्रेमाला बळी पडू नये, तसेच पालकांनीही जागरूक राहण्याचे आवाहन केले. 

वक्त्यांनी हिंदू धर्माची महानता पटवून देताना इतिहासातील पराक्रमी व्यक्तिमत्त्वांची उत्तम छान मांडणी करत उदाहरणे दिली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्यादेवी होळकर, ताराराणी आणि येसूबाई यांनी हिंदू धर्म व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून दिली. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राहुलजी मिश्रा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात हिंदू समाजातील नागरिक व व्यापाऱ्यांनी एकमेकांना मदत करून सुखदुःखात एकत्र राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील ऐक्य आणि परस्पर सहकार्य यामुळेच समाज अधिक सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन देवसर यांनी उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

या संमेलनाच्या माध्यमातून समाजात जागरूकता, एकजूट आणि सांस्कृतिक अभिमान वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

10 comments:

  1. अतिशय सुंदर दैदिप्यमान यशस्वीतेची मोहर उमटवणारे हे संमेलन समस्त टिटवाळा करांच्या लक्षात राहील असे होते टिटवाळा करांनी या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व आपली हजेरी लावली वंदे मातरम भारत माता की जय

    ReplyDelete
  2. हिंदू एकत्र झाले पहिल्यांदा टिटवाळा शहरात अभिनंदन आणि अभिमानास्पद

    ReplyDelete
  3. संमेलनानिमित्त हिंदू एकत्र झाले. ही आनंदाची व अभिमानाची गोष्ट.
    वक्त्यांची भाषणे अत्यंत प्रभावी व सध्याच्या परिस्थितीला अनुसरून होती.
    गर्व से कहो हम हिंदू है.

    ReplyDelete
  4. हिंदू हा बिंदू बिंदूत विखुरला आहे,पण तो जागृत झाला तर बिंदू बिंदूचा महासागर होऊ शकतो.व या महासागरात, या हिंदुस्थानात ज्या अदृश्य शक्ती अराजकता व देशद्रोही आणि समाज विघातक शक्ती वाढत आहेत,त्यांचा विनाश करण्याची ताकद या हिंदू समाजात आहे.
    हेच फलित "हिंदू संमेलनातून "प्राप्त होणार आहे.
    दत्तात्रय येवले,श्री क्षेत्र टिटवाळा.

    ReplyDelete
  5. खूप सुंदर झाला कार्यक्रम या निमित्ताने हिंदू एकत्र येत आहेत. आजच्या परिस्थितीत आपण हिंदूंनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे समाज विघातक शक्तींना तसेच देशद्रोहींना त्यांचा विनाश करण्यासाठी आपण एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे.
    या व अशाच हिंदू संमेलनातून हेच फलित प्राप्त होणार आहे.
    रोहिणी मं. भास्करे श्री क्षेत्र टिटवाळा.

    ReplyDelete
  6. हिंदू संमेलन ही काळाची गरज आहे. अशी संमेलने झाली तर हिंदू एकत्र येऊ शकतात. हिंदू संमेलन छान झाले. आयोजकांचे आभार

    ReplyDelete
  7. खूप छान

    ReplyDelete
  8. सर्व हिंदू जागृतच आहेत, पण अशा संमेलनाला उपस्थिती राहून आम्ही एक आहोत हेच दाखवून देणे जास्त गरजेचं आहे आणि जसा सहभाग या संमेलनात होता तसाच आणि त्यापेक्षा जास्तच सहभाग यापुढील संमेलनात असेल याबद्दल किंचित देखील शंका नाही.

    ReplyDelete
  9. अति उत्तम उत्सव हुआ।सभी हिन्दू भाई बंधु , माताएं और बहनें इसमें सम्मिलित दिखी। ऐसा अद्भुत समरसता संगम देखने को मिला। आयोजन समिति का हार्दिक अभिनंदन और आभार

    ReplyDelete

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...