Wednesday, 26 August 2020

महाड दुर्घटनेत वाचलेल्या त्या चार वर्षीय मुलांचे पालकत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले !

महाड दुर्घटनेत वाचलेल्या त्या चार वर्षीय मुलांचे पालकत्व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारले !


   बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या चार वर्षांच्या दोन लहानग्यांचे पालकत्व नगरविकासमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे.
मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत. तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर, इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे बचावला असून त्याचे कुटुंबीय मात्र सुदैवी ठरले नाहीत.
या दोन्ही लहानग्यांचे पालकत्व स्वीकारत असल्याचे श्री. शिंदे यांनी जाहीर केले आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील, तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. 
या दुर्घटनेचे वृत्त समजताच श्री. शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग दिला होता. ठाणे महापालिकेची २ आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाची तुकडीही श्री. शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे.
"८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आजही याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्व स्वीकारत आहे," असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...