Wednesday, 27 January 2021

गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !

गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !


विरार (दीपक मांडवकर / शांत्ताराम गुडेकर) :

           रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे मानले गेले आहे तसा संदेशही दिला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्यदिव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकुण ५६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी शताब्दी ब्लड बँकने सहकार्य केले. तर या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून गुहागर अडुर मुंबई मंडळाचे सचिव दिलीप हळवे, जनशक्ती दबावचे विषेश प्रतिनिधी (पत्रकार) दीपक मांडवकर, गुहागर पाटपन्हाळे मुंबई जागृती विकास मंडळाचे माजी अध्यक्ष भालचंद्र भेकरे, गुहागर अडुरवावडगाणेश्वर मिरुल विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप मांडवकर, साई एकदंत रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश नाडकर व प्रतिष्ठाचे सर्व सभासद उपस्थिती होते. सुरवातीला मिलिंद पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. तर गुहागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कदम यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सचिव गणेश हळये यांच्या अस गुहागर प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांच्या नेतृत्वाखाली हा सुवर्ण भवैदिव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला. गुहागर वाशीयांसाठी खंबीरपणे उभे राहू आणि कधीही रक्ताची गरज भासल्यास ते त्वरित त्यांच्या पर्यंत पोचवू असे मत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कदम यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!

उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...