Thursday, 1 April 2021

चरई खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली !!

चरई खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या  कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून खऱ्या अर्थाने धुळवड साजरी केली !!


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : तळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला चरई बुद्रुक या गावातील ग्रामस्थांनी रंगपंचमीच्या दिवशी शिवसेनेत प्रवेश केला. आणि खऱ्या अर्थानी धुळवड साजरी केली. अनेक वर्ष या गावावर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती पण विकास काही होत नाही. खोटी आश्वासने देऊन काम अर्धवट सोडून देणे. कामाच्या नावाखाली बिलं पास करुन घ्यायची मात्र काम झालेलीच नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थ आणि मुंबई करांनी शिवसेनेत प्रवेश केला. 
       या शिवसेना प्रवेशासाठी श्री मनोहर महादेव काप, श्री सुचित सहदेव पतारे, श्री बाळाराम तुकाराम काप, श्री.किरण गणपत ढऊळ यांनी अथक परिश्रम घेतले. त्या प्रसंगी उपस्थित दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख मा.श्री. अनिल नवगणे साहेब, दक्षिण रायगड जिल्हा महिला संघटक व कांजूरमार्ग मुंबई नगरसेविका मा.सौ.सुवर्णाताई करंजे, तळा तालुक्याचे डॅशिंग तालुका प्रमुख मा.श्री. प्रद्युम्न ठसाल साहेब, तळा तालुका सहसंपर्कप्रमुख मा. श्री. अशोक करंजे साहेब, शहर प्रमुख वडके साहेब, मा. श्री. सारगे साहेब, मा. श्री.अशोक राणे साहेब, भगवान शिंदे साहेब, श्री.मनोहर काप व चरई बुद्रुक मधील सर्व शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...