ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी आरसीसी हे प्रभावी माध्यम !
रोटरी क्लब चोपडा आयोजित प्रशिक्षण शिबिरामध्ये श्री गनी मेमन यांचे प्रतिपादन.
चोपडा, वार्ताहर :
या वर्षी चोपडा रोटरी क्लबच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त २४ आरसीसी (रोटरी कम्युनिटी कॉर्प) क्लबस् ची तालुक्यात २४ गावांमध्ये स्थापन करण्यात आल्या आहेत. आरसीसी क्लब हे मुख्य रोटरी क्लबशी समन्वय ठेऊन सहाय्यक म्हणून सामाजिक कार्यात मदत करतात. आपल्या गावात रोटरी क्लब सोबत कसे कार्य करू शकतो यांचे एक दिवसीय प्रशिक्षण शिबिर सर्व आरसीसी चे अध्यक्ष आणि सचिव साठी आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे चेअरमन श्री गनी मेमन यांनी आरसीसी क्लब स्थापनेचे उद्दिष्ट व उद्देश तसेच ग्रामीण भागातील विविध समस्या सोडवण्यासाठी क्लब ची रचना, सहकार्य तसेच विविध शासकीय योजनांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचून त्यांच्या पूर्ततेसाठी क्लबने करावयाच्या पाठपुरावा इत्यादी विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले तसेच शिबिरातील उपस्थित शिबिरार्थींकडून त्यांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या.
मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी चे सह प्रांतपाल योगेश भोळे,रुरल इनक्लेव चेअर सौ संगीता पाटील,गोल्ड सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ गोविंद मंत्री, रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव, सचिव ॲड. रुपेश पाटील,आरसीसी कमिटी चेअर ईश्वर सौंदांकर उपस्थित होते.
या शिबिरात विकी निकम (वेले), पन्नालाल पवार (उमर्टी), गोपाल पाटील (बोरअजंटी),विनोद पाटील (सत्रासेन), विशाल गवळी (वराड), प्रदीप पाटील (तावसे), प्रणव ठाकरे (मंगरूळ), चंद्रकांत पाटील (खडगाव), मनोज पाटील (रुखन खेडा), मुकेश पाटील (चहार्डी), हर्षल माळी (आडगाव), किरण बडगुजर (अकुल्खेडा), समाधान पाटील(चौगाव), विशाल धनगर (नरवाडे), भूपेंद्र धनगर (तांदलवाडी), सुरेश पाटील (खेडीभोकरी), ललित पाटील (गोरगावले खुर्द), राकेश पाटील (काजीपुरा), शुभम पाटील (खर्डी), नरेंद्र पाटील (लोणी), मोहन चव्हाण (वर्डी), दीपक पाटील (हातेड), भुषण पाटील (अडावद), महेंद्र माळी (लासुर) या सर्व अध्यक्षांना रोटरी इंटरनॅशनल कडून त्या त्या गावांसाठी प्राप्त झालेले आरसीसी चे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. एकूण चोवीस गावांच्या प्रतिनिधींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी तर सूत्रसंचालन गौरव महाले तर आभार प्रदर्शन रोटरी सचिव रुपेश पाटील यांनी केले सदर कार्यक्रमासाठी रोटरीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

No comments:
Post a Comment