Saturday, 19 June 2021

मतदार याद्यांच्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरू : तहसीलदार / मतदार नोंदणी अधिकारी माणगांव

मतदार याद्यांच्या निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरू : तहसीलदार / मतदार नोंदणी अधिकारी माणगांव


         बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव तालुक्यातील मतदारांना सूचीत करण्यात येते की, सद्य स्थितीत छायाचित्रासह मतदार यादीचा निरंतर पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्या अनुषंगाने माणगांव तालुक्यातील १९३ - श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांतर्गत असणाऱ्या ७४ व १९४ - महाड विधानसभा मतदार संघांतर्गत असणाऱ्या ११३ अशाप्रकारे एकूण १८७ मतदान केंद्रामध्ये मतदार नोंदणी, मतदार तपशील मध्ये दुरूस्ती तसेच मयत, दुबार व कायम स्वरूपी स्थलांतरित मतदारांची वगळणी बाबत दावे व हरकती स्विकारण्याची प्रक्रिया सर्व मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांचे मार्फत सुरू आहे. 
      यास्तव, माणगांव तालुक्यातील सर्व Residual voters (मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले मतदार) यांनी त्यांचे रंगीत पासपोर्ट साईज फोटो नमुना नंबर ८ सह संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( BLO ) यांचे कडे दिनांक ३० / ०६ / २०२१ रोजी पर्यंत जमा करावेत. तसेच सदरहू Residual voters मयत अथवा कायमस्वरूपी स्थलांतरित असल्यास त्यांचे कुटुंब प्रमुख यांनी संबंधित मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ( बिएलओ ) यांचेकडे नमुना नंबर ७ पुढील आठ दिवसात भरून द्यावे. तसेच जे मतदार कामानिमित्त बाहेर गावी राहत असतील, त्यांनी नमुना नंबर ८ करीता nvsp.in या पोर्टल वरून ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच ही सुविधा आपले जवळच्या तलाठी कार्यालय व तहसील कार्यालय माणगांव येथे निवडणूक शाखेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
     असे मा. श्री. अनिल शेडगे, मा. मतदार नोंदणी अधिकारी, १९३- श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ व मा. सौ. प्रतिमा शेंगुलवार, मा. मतदार नोंदणी अधिकारी, १९४ - महाड विधानसभा मतदारसंघ तसेच सौ. प्रियांका आयरे, सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार माणगांव यांनी अवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...