मुंबईकरांसाठी काळरात्र; चेंबूर नंतर विक्रोळीत दुर्घटना, 21 जणांचा मृत्यू.:!
अरुण पाटील, भिवंडी, दिं.18 :
मुंबईरांसाठी काळरात्र ठरलेल्या चेंबूर व विक्रोळी येथे एकच रात्री घडलेल्या दोन दुर्घटनान मध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे.
रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला झोडपून काढलं आहे. एका रात्रीत मुंबईत दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.या दुर्घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांसाठी मध्ये मदतीचीही घोषणा केली आहे. या मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर यात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही एनडीआरएफचं पथक घटनास्थळी हजर आहे. बचावकार्य सुरू आहे. एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास हा प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, टीम येण्याआधी स्थानिकांनी 2 मृतदेह बाहेर काढले होते. तर NDRFच्या टीमनं 10 मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढले आहेत. तसेच, अजूनही 7 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता एनडीआरएफच्या टीमनं वर्तवली आहे.
विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या मध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य वेगात सुरु आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत . मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून यात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment