Monday, 19 July 2021

दिलासादायक : कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पटीहून अधिक ! मृत्युंचा आकडा शंभरच्या खाली !

दिलासादायक : कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पटीहून अधिक ! मृत्युंचा आकडा शंभरच्या खाली !


मुंबई : राज्यात दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा काहीशी जास्त तर कधी कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक जण करोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. राज्यभरात आज दिवसभरात १३ हजार ५१ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ६ हजार १७ नवीन करोनाबाधित आढळून आले. याशिवाय ६६ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५९,९३,४०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ५६, ४८, ८९८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२०,२०७ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६१,७९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९६,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...