Wednesday, 21 July 2021

कल्याण परिसरात पावसाची धुमचक्री सुरुच, काटेमानिवलीत झाड पडल्याने चार घंराचे नुकसान, घोटसईत शेतकऱ्यांच्या घरात पाणी, आपटी बंधारा तुंडूब !

कल्याण परिसरात पावसाची धुमचक्री सुरुच, काटेमानिवलीत झाड पडल्याने चार घंराचे नुकसान, घोटसईत शेतकऱ्यांच्या घरात पाणी, आपटी बंधारा तुंडूब !


कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कल्याण परिसर जलभय झाला असून काटेमानिवलीत एक मोठे झाड पडल्याने ३/४ घरांचे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील घोटसई गावातील शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. उल्हास नदीवर असलेला आपटी बंधारा तुंडूब भरुन वाहत आहे.


कल्याण तालुक्यात रविवार पासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरी काही ठिकाणी मात्र भातलावणी केलेली शेते पाण्यानी भरल्याने रोपे कुजण्याची भिती व्यक्त केली जाते. कल्याण जवळील काटेमानिवली परिसरात एक भलेमोठे झाड पडल्याने ३/४ घरांचे नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील घोटसई गावातील गरीब शेतकरी बाळू भिकू सुरोशे या ८० वर्षे वयाच्या शेतकऱ्यांच्या घरात पावसांचे पाणी घुसल्याने मुलगा ज्ञानेश्वर सुरोशे, सुन व नातवंडांना पाण्यात भिजत दिवस काढावे लागत आहे, याबाबत त्यांनी ग्रामसेवक तूषार पाटील यांनी ही अडचण सांगितली असता घरात ८/१० फुट पाणी भरल्यानंतर पंचनामा करायला येतो, असे संतापजनक उत्तर दिल्याचा आरोप ज्ञानेश्वर सुरोशे यांनी केला आहे. तसेच आम्ही वांरवार ग्रामपंचायतीकडे या बाबत विचारणा केली मात्र प्रत्येक वेळी त्यांनी उडवाउडवीची व उध्दट उतरे दिल्याचे ही त्यांचे म्हणणे आहे.


दरम्यान तालुक्यात आतापर्यंत १६९० मिलीमीटर इतका पाऊस पडला. यामुळे अनेक नदी नाल्यांना पुर आला आहे, म्हारळ यथील सखल भागात पाणी साचले आहे, कल्याण मुरबाड रस्त्यावर थारवानी, वरप येथील बंजरंग हार्डवेअयर ,टाटा पावर हाऊस, सीएनजी पंप येथे पाणी भरले आहे. तर उल्हास नदीवरील आपटी बंधारा तुंडूब भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून बरसणारा वरुणराजामुळे  बळीराजा सुखावला असला तरी नुकत्याच भातलावणी केलेली शेते पावसाच्या पाण्याने भरल्याने ही रोपे कुजण्याची भिती व्यक्त केली जाते आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...