वसईत दारुचे व्यसन असलेल्या आईची मुलाकडून हत्त्या.!
अरुण पाटील, भिवंडी,(कोपर ) दिं.21
मुंबईनजीक असणाऱ्या वसई या ठिकाणी
दारूचे व्यसन लागलेल्या एका आईची हत्त्या मुलाने केल्याची घटना उघडकीस आली आहे.
आईला दारूचं व्यसन असून ती सतत दारूच्या नशेत असायची, या कारणातून 18 वर्षीय तरुणानं ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
18 वर्षीय आरोपी तरुण आपल्या 59 वर्षीय आईसोबत वसईच्या कोळीवाडा परिसरातील आयशा अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला आहे. तर मृत 59 वर्षीय महिलेला दारूचं व्यसन होतं. मागील बऱ्याच काळापासून मृत महिला दारूच्या आहारी गेली होती. आपली आई सतत दारुच्या नशेत असते, ही बाब 18 वर्षीय मुलाला सतत खटकत होती. यामुळे दोघांत अनेकदा छोटे-मोठे वाद होतं होते. पण आईचं दारूचं व्यसन काही सुटत नव्हतं.
मंगळवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मृत महिला दारुच्या नशेत असताना त्या दोघां माय लेकामध्ये पुन्हा वाद झाला. या वादानंतर संतापलेल्या मुलाने कोयत्यानेआपल्या आईची निर्घृण हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. यानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास वसई पोलीस करत आहेत.

No comments:
Post a Comment