Wednesday, 21 July 2021

रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या अंगीकृत रुग्णालयांवर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करावी !! ....'वैभव गिते'

रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या अंगीकृत रुग्णालयांवर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करावी !! ....'वैभव गिते' 


*सर्व जाती धर्मांच्या नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळण्यासाठी पुरंदर व दौण्ड प्रांतधिकारी यांना एन.डी.एम.जे संघटनेचे निवेदन*


कोरोना कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढल्याने आढावा घेण्यासाठी दौण्ड व पुरंदर येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी हे शासकीय कामानिमित्त दौंड तहसिल कार्यालयात आल्याची बातमी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना समजताच नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव ऍड. डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांच्या नेतृत्वाखाली दादासाहेब जाधव,पांडुरंग गडेकर, प्रकाश पारदासनी, महेश नवगिरे, अमर जोगदंड, संतोष जाधव, अमित मोरे यांच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देऊन चर्चा केली.


राज्य सचिव वैभव गिते यांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयात पिवळी, केशरी व पांढऱ्या शिधापत्रिका धारक सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना कोरोना कोविड 19 या आजारावर मोफत उपचार मिळालेच पाहिजेत. रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या हॉस्पिटलवर गुन्हे दाखल करून मान्यता रद्द करावी अशी मागणी केली. पश्चिम महाराष्ट्र निरिक्षक दादासाहेब जाधव यांनी दौंड व पुरंदर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या व्यथा प्रशासन दरबारी मांडून गरिबांना मोफत उपचार देण्यात भेदभाव करू नये असे सांगितले
पुणे जिल्हा निरिक्षक पांडुरंग गडेकर यांनी निवेदनावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास दौंड तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. यावेळी प्रकाश पारदासनी, भाऊ भागवत, नवनाथ भागवत, प्रणव संदीप भागवत हे उपस्थित होते. पुरंदर व दौण्डचे  प्रांतधिकारी यांनी रुग्णालयांकडू अहवाल आल्यावर कार्यवाही करतो असे आश्वासन संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले.

आदर्श भालेराव 
+91 80707 05552

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...