Friday, 6 August 2021

विवेक पंडित यांचा आदिवासी वाडी-पाड्यांचा पाहाणी दौरा ! "कल्याण तालुक्यातील आदिवासींच्या समस्या" घेतल्या जाणून

विवेक पंडित यांचा आदिवासी वाडी-पाड्यांचा पाहाणी दौरा !
"कल्याण तालुक्यातील आदिवासींच्या समस्या" घेतल्या जाणून


टिटवाळा, उमेश जाधव -: आदिवासी क्षेत्र आढावा समीती अध्यक्ष महाराष्ट्र शासन राज्यमंत्री विवेक पंडित यांनी कल्याण तालुक्यातील आदिवासी वाडी- पाड्यांचा गुरूवारी दौरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 


कल्याण तालुक्यात एकुण ३६ आदिवासी वाड्या-पाडे आहेत. या आदिवासी वाडी-पाडे आज ही अनेक सोयी सुविधांपासून वंचित आहेत. यापैकी खडवली जिभोणी कातकरीपाडा, वाव्होली सागवाडी, मानिवली कातकरीपाडा व नेतीवली कातकरीपाडा या ठिकाणी गुरूवारी आदिवासी क्षेत्र आढावा समीती अध्यक्ष महाराष्ट्र शासन राज्यमंत्री विवेक पंडित यांनी पाहाणी दौरा करून आदिवासी जमातीतील कातकरी कुंटुबांची नागरी सुविधांबाबत चौकशी केली. 


यावेळी देशाच्या स्वांतत्र्याच्या ७४ वर्षानंतर खरे स्वांतत्र्याची किरणे गरीबांच्या झोपड्डी पर्यंत पोहचलेली नाही.  आनेक आदिवासी कुंटुबांना घरकुल नाही, शुध्द पिण्याचे पाणी नाही, आधारकार्ड व रेशनकार्ड देखील नाही. असे चित्र यावेळी पंडित या दौऱ्या दरम्यान दिसून आले. या सर्व गोष्टी कातकरी कुंटुबांना मिळाल्या पाहीजेत.  या बाबत शासनाने ठरवुन दिलेल्या योजनांची अंमलबजावणी शासकीय अधिकाऱ्यांनी करावी. अशा सुचना यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाला पंडित यांनी केल्या. यावेळी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापुर, प्रकल्प आधिकारी आर.एच.किल्लेदार, कल्याण तहसिलदार दिपक आकडे, गटविकास आधिकारी श्वेता पाळवे, महिला व बालविकास प्रकल्प आधिकारी चौधरी, मंडळ आधिकारी संजय सांळुखे, खडवली नंडगाव व वाव्होली सजा तलाठी व  संबधित ग्रामपंचायतिचे ग्रामसेवक, क.डों.म.पा. प्रभाग क्षेत्र आधिकारी, वकर्मचारी, श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी जि.अध्यक्ष आशोक सापटे, जि. सरचिटणीस राजेश चन्ने, दशरथ भालके, ता. अध्यक्ष विष्णु वाघे, उपाध्यक्ष ज्योती फसाले, विभागीय सचिव लक्ष्मण वाघे आदी दौऱ्यात  सहभागी झाले होते. 

विकेक भाऊ पंडित यांनी तालुक्यातील संपूर्ण आदिवासी पाडे व वाड्यांचा पहाणी करून आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात. तर त्यांची सध्या असणारी परीस्थिती शासन दरबारी मांडण्यास आपणास सोयीस्कर होईल. अशी मागणी श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या बाबीचा विचार करून लवकरच इतर आदिवासी पाडे व वाड्यांचा पहाणी दौरा करण्यात येणार असल्याचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...