Tuesday, 7 December 2021

कल्याण वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांची कामगिरी !! "सहा वर्षाच्या मुलीस पोहोचवले सुखरुप घरी"

कल्याण वाहतूक शाखेच्या पोलीस अंमलदारांची कामगिरी !!
"सहा वर्षाच्या मुलीस पोहोचवले सुखरुप घरी"

कल्याण, बातमीदार : कल्याण शहर वाहतूक उपशाखेचे पोहवा रोहिदास कावळे व वार्डन जयंत इसामे हे दुर्गाडी येथे ड्युटीवर असताना एका ऑटोचालकाने सहा वर्षाच्या मुलीस त्यांच्या स्वाधीन केले. तेव्हा सदर मुलीची चौकशी केली असता आपले नाव दुर्वा असून अनेगाव येथील रहिवाशी आहे इतकेच सांगू शकत होती, अशावेळी प्रसंगावधान राखून वार्डन इसामे व राकेश पाटील यांनी तिचा फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला.

सोशल मीडियावर त्याच गावातील एका व्यक्तीने हा फोटो पाहुन त्या मुलीच्या वडिलांना कल्पना दिली. त्यानंतर त्या मुलीचे आई वडील यांनी दुर्गाडी येथे आले असता पोलीस चौकशीत त्यांनी दुर्गाला तीची आई हाताला मालीश करण्याकरीता कल्याणला घेऊन आली नंतर कामाला जायला उशीर होत असल्याने मुलीस कल्याण मिलिंद नगर येथील मावशीकडे ठेवले, दुपारी मावशी झोपली असता ही मुलगी आईच्या आठवणीने घराबाहेर शोधत निघाली. नंतर रडतरडत भरकटत राहिली त्यातच एका रिक्षाचालकाने सदर मुलीस ताब्यात घेवून पो.हवा रोहिदास कावळे व वार्डन जयंत इसामे ताब्यात दिले. वरील सर्व माहिती घेऊन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे बिट मार्शल यांच्या समक्ष सदर मुलीस आईवडीलांच्या सुपूर्द केले.

कल्याण शहर वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक तरडे साहेब आणि सहाय्यक पोलीस उपायुक्त धर्माधिकारी साहेब यांनी केले कौतुक.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...