Friday, 21 January 2022

कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयोग ! एक दिशा मार्ग !!

कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रयोग ! एक दिशा मार्ग !!


कल्याण, बातमीदार : कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सॅटिसचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथे सकाळ आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कल्याण वाहतूक पोलिसांनी काल सकाळ सात वाजल्यापासून स्टेशन परिसरात प्रायोगिक तत्त्वावर एक दिशा मार्ग सुरू केला आहे. 


एक दिशा मार्गनुसार कल्याण पश्चिमेला शिवाजी चौकमधून स्टेशनकडे जाताना पुष्पराज हॉटेलच्या उजव्या बाजूने जाण्यास बंदी असून त्या वाहनचालकाने महात्मा फुले चौककडे जाऊन उजव्या बाजूने जाऊ शकतो. तसेच कल्याण एसटी डेपोकडून आलेल्या वाहनचालकाला मुरबाड रोडकडे जाताना दीपक हॉटेलच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावर जाण्यास बंदी असून त्याने वाहन दीपक हॉटेलकडे आल्यावर डाव्या बाजूने वळून पुष्पराज हॉटेलमार्गे महात्मा फुले चौक मार्गे पुढे जायचे आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसरात सॅटिस काम सुरू असल्याने सकाळ आणि संध्याकाळी स्टेशनबाहेरील रस्त्यावर एकाच वेळी नागरिक आणि वाहने येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एक दिशा मार्ग प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले आहेत. - महेश तरडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कल्याण वाहतूक विभाग.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...