शिवजयंती उत्सव मित्र मंडळ नागीनदासने केली उत्साहात शिवजयंती साजरी !!
नालासोपारा, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :
नागीनदासपाडा नालासोपारा पूर्व येथील नवतरुणांची बांधीलकी असलेले शिवजयंती उत्सव मित्र मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कायम उराशी बाळगून या वर्षी देखील जोरदार उत्सव साजरा केला.
दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील वसई किल्ला शंकराच्या मंदिरातून येथून शिवाजोत आणून सकाळी महाराजांना अभिषेक करून मूर्तीची स्थापना केली. तर दुपारी पांडव ढोल ताशा पथक यांनी आपली कला सादर करून परीसर दणाणून टाकला तर तरुणींनी व महिलांनी लेझीम सोबत पालखी मिरावणून शंभर मीटर पर्यंत करण्यात आली.
तर रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमात बाल शरीर वेदांत मांडवकर यांनी पोवाडा सादर करून रसिकांची मने जिंकली. तर रात्री सुस्वर भजन करून शिवरायांच्या जयघोषात शिवजयंती उत्सव मित्र मंडळाने साजरी केली.




No comments:
Post a Comment