Saturday, 5 February 2022

भारताने पटकाविला पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक !!

भारताने पटकाविला पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक !!


ठाणे, बातमीदार : अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं इंग्लंडला ४ विकेट्सनं पराभूत केलंय. या विजयासह भारतानं पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर नाव कोरलंय.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी १८९ धावांवर रोखलं. त्यानंतर भारतीय संघानं हे लक्ष्य ४७.४ षटकात पूर्ण करून अंडर-१९ विश्वचषक २०२२ चा किताब जिंकलाय.

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८९ धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूनं ९५ धावांची झुंज दिली. तर, भारताकडून बावानं ५ विकेट्स घेऊन इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला आहे.


No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...