शिवतेज युवा प्रतिष्ठान तर्फे मुरबाड येतील फांगणे गावात शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा !!
कल्याण, हेमंत रोकडे : शिवतेज युवा प्रतिष्ठान च्या पुढाकाराने फांगणे गावात शिवजन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला शिवजन्मभूमी शिवनेरी वरून शिवज्योत आणण्यात आली.
तसेच शिव प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच या गावातील सर्व ग्रामस्थांची युवकांची, आजीबाई शाळेतील, आजीबाई गावातील सर्व महिलांची साथ लाभली, शिवजन्मोत्सव निमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शिवरायांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिवविचार जनामनात पोहचवण्यासाठी गायिका काजल ताई सुरोशे यांच्या शिवभजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.



No comments:
Post a Comment