Saturday, 28 May 2022

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ ची आरटीई २५ टक्के प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ ·३ जून अंतिम मुदत !

शैक्षणिक वर्ष २०२२- २३ ची आरटीई २५ टक्के प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ ·३ जून अंतिम मुदत !


बुलडाणा, बातमीदार, दि. २८ : जिल्हयातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम- २००९ नुसार दरवर्षी प्रमाणे सन २०२२- २३ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार २०२२- २३ या वर्षांच्या आरटीई २५ टक्के प्रक्रियेच्या प्रवेशाची सोडत (लॉटरी) ३० मार्च २०२२ रोजी राज्यस्तरावरुन काढण्यात आलेली आहे. 

निवड यादीतील बालकांचे प्रवेश शाळेत जावून घेण्याची मुदत २७ मे २०२२ पर्यंत देण्यात आलेली होती. या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाला ३ जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून अलॉयमेंट लेटरची प्रिंट काढून विहीत मुदतीत तालुका स्तरावरील कागदपत्रे पडताळणी समिती केंद्रावर जावे. कागदपत्र पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करावा. तरी याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळा, पालक व तालुकास्तरावरील संबंधित यंत्रणांनी नोंद घ्यावी. जास्तीत जास्त बालकांना प्रक्रियेत सहभागी करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) किशोर पागोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...