Friday, 3 June 2022

'अ' प्रभाग क्षेत्रातील ३४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त !! *सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांची धडक कारवाई*

'अ' प्रभाग क्षेत्रातील ३४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त !!

*सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांची धडक कारवाई*


मोहने,संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. 

अटाळी, मोहने, गाळेगाव, बल्याणी, आदी प्रभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार 'अ' प्रभाग क्षेत्राचे 'सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते' यांनी थेट कारवाईच्या ठिकाणी उपस्थित राहून बल्याणी परिसरातील तयार झालेले व तयार होत असलेले ३४ जोते व तयार होत असलेल्या चार खोल्या जमीनदोस्त केल्या या कारवाईमुळे बिल्डरांचे चांगलेच धाबे दणाणले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या कारवाईबाबत 'सहायक आयुक्त सुहास गुप्ते' यांना विचारले असता दर दोन दिवसांनी 'अ' प्रभाग क्षेत्रात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच पालिका क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची प्रशासन दखल घेत आहे. 
एका जेसीबी च्या साह्याने सर्व बांधकामे निष्कासित करण्यात आली. 

या कारवाईच्या वेळी चार पोलिस कर्मचारी, सर्व्हेअर शरद सकपाळ कर्मचारी सुनील भालेराव यांसह अनधिकृत बांधकाम पथकातील कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !!

सैतवडे परटवणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी !! *श्री विलासराव कोळेकर यांना जिवन गौरव...