Wednesday, 22 June 2022

सरकार अल्प मतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी " वर्षा" बंगला सोडला, हजारो शिव सैनिकांच्या डोळ्यात आले पाणी !

सरकार अल्प मतात आल्याने उद्धव ठाकरे यांनी " वर्षा" बंगला सोडला, हजारो शिव सैनिकांच्या डोळ्यात आले पाणी !


भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील (कोपर) :
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिव सेनेच्या एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्याने सरकार अल्प मतात आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन करुनही शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे माघारी येण्यास तयार नाहीत. हे पाहून मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा' बंगला सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतावेळी हजारो शिवसैनिक बंगल्याबाहेर जमले होते. यावेळी कट्टर शिव सैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या गगनभेदी घोषणा देऊन शिवसैनिक पक्ष नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असल्याचं दाखवून दिले आहे. त्यांना याबाबत आपल्या फेसबूक लाईव्हमध्ये पूर्वीच सुचना दिली होती.
उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडतेवेळी सगळेच शिवसैनिक कमालीचे भावूक झाले होते. शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर फुलांचा वर्षाव केला. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांचे प्रेम पाहून गलबलून गेले, त्यांच्या डोळ्यात पाणी दाटले होते. त्यांनी शिव सैनिकांचं अभिवादन स्वीकारत गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून मातोश्रीच्या दिशेने निघून गेले. यावेळी त्यांच्या बरोबर पुत्र आदित्य ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे देखील होत्या.
       मुख्यमंत्री बुधवार दिं, २२ रोजी रात्री साडे नऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी उपस्थिती होती. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर करण्यात आला. यावेळी शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला होता. शिवसैनिकांचं प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...