भिवंडीच्या नायब तहसीलदार पदी आदेश म्हात्रे यांना बढती, कर्मचारी, पत्रकार व शुभचिंतकांनी दिल्या शुभेच्छा !
भिवंडी, दिं,२४, अरुण पाटील (कोपर) :
ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त सक्रिय असेल्या भिवंडी तहसीलदार कार्यालया अंतर्गत असणाऱ्या मंडळ अधिकारी- भिवंडी येथे कार्यरत असलेले श्री. आदेश म्हात्रे यांना भिवंडी नायब तहसीलदार (महसूल) पदी बढती मिळाली असून त्यांनी सोमवारी ( दिं,२२) रोजी संध्याकाळी पदभार स्वीकारला आहे. त्यांना तेथील अधिकारी, कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच या वेळी पत्रकार व शुभचिंतकांनी देखील पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत.
श्री. आदेश म्हात्रे यांनी तलाठी म्हणून भिवंडी तालुक्यातील कोशिंबे, कवाड, पूर्णा, कोन, दापोडे, अंजूर या तलाठी सजेत कर्तव्य बजावले. तर मंडळ अधिकारी -- वसई, मंडळ अधिकारी --शहापूर, व शेवटी मंडळ अधिकारी --भिवंडी या ठिकाणी कर्तव्य पार पाडले.

No comments:
Post a Comment