Monday, 22 August 2022

ग्रामपंचायत उमराठच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा !

ग्रामपंचायत उमराठच्यावतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा !


[ निवोशी/गुहागर-: उदय दणदणे ] :
 
देशाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त हर घर तिरंगा अभियान प्रत्येक गावात राबविण्यात आले. या अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठ कार्यालय, उमराठ शाळा नं.१ तसेच उमराठ शाळा नं. ३ येथे तिन्ही ठिकाणी संयुक्तिकपणे १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्याने राष्ट्रध्वज उभारून तिरंगा फडकविण्यात आला.  या कालावधीत ग्रामपंचायत कार्यालय, उमराठ शाळा नं.१ तसेच उमराठ शाळा नं. ३ येथे तिरंगी पताका, रंगी-बेरंगी फुगे, फुलांच्या माळा आणि विद्युत रोषणाईने सजावट केलेली होती. दि.१५ आँगस्ट रोजी सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या शुभ हस्ते तर शाळा नं.१ येथे मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून तिरंगा फडकविण्यात आला. 


सुरूवातीला उमराठ शाळा नं. १ ते ग्रामपंचायत कार्यालय उमराठ पर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांच्या 
बॅंड पथकाच्या सहकार्याने वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषेत प्रभात फेरी काढण्यात आली. यामध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग, पालकवर्ग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक आणि ग्रामस्थ मंडळी  मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 


त्या नंतर शाळेतील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्यदिव्य असे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभक्तीवर आधारित शाळेतील मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर यांची तसेच विद्यार्थींची भक्तीगीते, किर्तनातून प्रबोधन, पोलीस पाटील वासंती आंबेकर व विनायक कदम यांची स्वातंत्र्यसैनिकांना आणि देशभक्तांना/महापुरुषांना पोवाड्यातून मानवंदना, शाळेच्या विद्यार्थींनी समर्पक वेशभूषेतून देशभक्तीवर आधारित व्यक्त केलेली मनोगते, इत्यादींचा समावेश होता. या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रदिप रामाणे सरांनी हार्मोनियमची तर अनिल अवेरे सरांनी ढोलकीची उत्तम साथ दिली. 

सदर प्रसंगी माजी सैनिकांचा सुद्धा ग्रामपंचायतीतर्फे सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कै. नारायण रामचंद्र पवार यांच्यावतीने त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती चंद्रभागा नारायण पवार यांनी तर दिपक धाकू जालगावकर यांच्यावतीने अशोकराव जालगावकर यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गौरवपत्र स्विकारले. तसेच सद्या हयात असलेले माजी सरपंच सौ. सविता भिकू गावणंग, गंगाराम बाबाजी घाडे, सौ. वैशाली वसंत गोरिवले, संदिप हरिश्चंद्र गोरिवले व कु. गुलाब विजय गावणंग आणि माजी उपसरपंच गणपत बाळू गावणंग, उदय लक्ष्मण पवार व कृष्णा गोविंद गोरिवले यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ देऊन गावाच्या विकासासाठी सहभाग दिल्याबद्दल तसेच उमराठ खुर्दच्या पोलीस पाटील वासंती आंबेकर यांच्या अष्टपैलू कामगिरी बद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि गौरवपत्र देऊन विद्यमान सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

यावेळी गावातील १० वी, १२ वी, पदवीधर तसेच विशेष नैपुण्य मिळविणाऱ्या कु. तनुजा प्रकाश पवार, कु. प्रतिज्ञा रामदास जालगावकर आणि कु. समृद्धी सुरेश आंबेकर यांचा सुद्धा सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सदर प्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित हर घर तिरंगा अभियानांतर्गत उमराठ गावात आठ दिवस चाललेल्या विविध उपक्रमांना सर्व ग्रामस्थ, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामपंचायत कार्यालय आणि उमराठ शाळा नं. १ येथे सजावट आणि संपुर्ण कार्यक्रमांचे/उपक्रमांचे पद्धतशीर नियोजन केल्याबद्दल सर्वांचे विशेषतः नितीन गावणंग, प्रशांत कदम, शाळा कमिठीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, विनायक कदम, अविनाश कदम, देवेंद्र जालगावकर, अभिषेक जालगावकर, महेश गोरिवले, शुभम पवार, मंथन गोरिवले, योगेश पवार, निलेश पवार, नरेश पवार, इत्यादी मंडळींचे सरपंच जनार्दन आंबेकर यांनी भरभरून कौतुक करून सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. 

सरतेशेवटी सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धन संदर्भात *"आम्ही गावकरी शपथ घेतो की, आम्ही निसर्गाचे रक्षण करू, प्लास्टिक वस्तू वापरणार नाही, वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करू तसेच वृक्षतोड, शिकार, वनवा यापासून निसर्गाला वाचवू."* अशी शपथ दिली तर मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...