Wednesday, 24 August 2022

रायते पुलाजवळ खड्डेच खड्डे, खड्डे चुकविण्याच्या नादात मोठ्या अपघाताची शक्यता !

रायते पुलाजवळ खड्डेच खड्डे, खड्डे चुकविण्याच्या नादात मोठ्या अपघाताची शक्यता !


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गावरील उल्हास नदीवर असलेल्या रायते येथील पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे चुकविण्याच्या नादात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, विशेष म्हणजे संपूर्ण तालुक्यात खड्डे असताना कल्याण च्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र काही खड्डे बुजविण्याचा देखावा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली आहे.


कल्याण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग, अथवा अंतर्गत रस्ते असे एकही रस्ता नाही की ज्यावर खड्डे नाहीत, काही ठिकाणी सिंमेटचे रस्ते आहेत पण थोडे अंतर पुढे गेल्यावर परत खड्डे दिसतात, त्यामुळे त्यांना खड्डे येथे मुक्त रस्ते म्हणता येईल का? कल्याण मुरबाड महामार्ग, रायते बदलापूर रस्ता, टिटवाळा खडवली, खडवली फळेगाव, निंबवली सांगोडा, रायते अंबरनाथ, टिटवाळा गेरसे कोसले अशी किती नावे घ्यायची, प्रत्येक रस्त्यावर खड्डे आहेत.


म्हारळ, वरप कांबा येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे येथील परिस्थिती तर बिकट, दयनीय आहेच, पण त्याबरोबर रायते येथील उल्हास नदीच्या पुलाजवळ पांजरापोळ बाजूला मोठ मोठे खडे पडले आहेत, तसेच पुलाच्या रायते बाजूला देखील खड्डे आहेत, त्यामुळे येथे खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात झाला तर गाड्या सरळ नदीपात्रात कोसळू शकतात, काही महिन्यापूर्वी मोठा टँकर पुलावरून नदी पात्रात कोसळला होता. रायते येथे महसूल कर्मचाऱ्यांचा भिषण अपघात झाला होता. गोवेली येथे वडाच्या झाडाजवळ असेच खड्डे पडले आहेत.


असे असताना कल्याण सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसापूर्वी खड्डे बुजविण्याचे उद्घाटन केले, नव्हे तसा दिखावा निर्माण केला, आणि फोटो सेशन करून स्वतःची पाठ थोपवून घेतली, त्यामुळे तालुका खड्डे मुक्त झाला का? असा प्रश्न निर्माण होतो आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...