चिपळूण, प्रतिनिधी : कोकणातील संगमेश्वर तालुक्याला सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा आहे. तालुक्यातील अनेक गावांत पुरातन देवदेवतांची मंदिरे दिसून येतात. यापैकी चिपळूण- सावर्डे मधून जवळीक असणारे, चहू बाजूंनी पाण्याने वेढलेले अद्वितीय असे कौलारी शिवममंदिर अर्थातच श्री मल्लिकार्जुन मंदिर हे स्थापत्यशास्त्र असणारे उत्तम नमुना आहे.या मंदिरात सभोवताली असणारे नैसर्गिक झऱ्याचे पाणी तलावात साठविल्याने ह्या मंदीरातील शिवलिंग सतत पाण्यात राहते. मंदिराची संपूर्ण निर्मिती तळ्याच्या मध्यभागी केलेली आहे.श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवारी या मंदिरात अनेक भाविक, पर्यटक मोठ्या संख्यने दर्शनासाठी उपस्थित राहतात. दरम्यान श्री मल्लिकार्जुन मंदिर, कार्यकारिणी समितीतर्फे या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम देखील उत्साहाने राबविले जातात. ह्या पवित्र स्थळाला बाजूच्या निसर्गाने देखील सौंदर्यात भर घातलेली आहे. कोकणातील एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून ह्या मंदिराचा उल्लेख होताना दिसतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी तालुक्यातील अशा छोट्या- मोठ्या मात्र आजवर दुर्लक्षित असलेल्या स्थळांकडे आता पर्यटक वळू लागले आहेत. म्हणून प्रतिवर्षी श्रावण महिन्यात संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे गावचं सुप्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन मंदिर पर्यटक, भाविकांना खुणावत असते.
सौजन्य - श्री दिपक कारकर ( मुर्तवडे- चिपळूण )


No comments:
Post a Comment