जळगाव, दि. ३० : सही पोषण देश रोशन, प्रत्येक घर पोषण उत्सव हे अभियान ९ ते ३० सप्टेंबर पर्यंत मनपातर्फे शहरात राबविण्यात आले होते. आज राष्ट्रीय पोषण आहार अभियान उत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थी मातांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बेबी केअर किटचे वाटप करून सेविकांना महापौर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालिका तथा जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनील महाजन , शहराचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे, महापालिका आयुक्त डाँ. सौ.विद्या गायकवाड, नगरसेवक प्रशांत नाईक यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, सहकारी, अंगणवाडी सेविका मदतनीस आदी उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !!
उरण शहरात लवकरच सुरु होणार पोस्ट कार्यालय !! नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण. उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली अनेक महिने उरणच्...
-
भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !!भिवंडी तालुक्यातील काल्हेर ग्राम पंचायतीच्या गुरुचरण जागेवरिल अतिक्रमण सरकारी मोजणीत झाले निश्चित !! भिवंडी, काल्हेर ग्रामपंचाय...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...

No comments:
Post a Comment