Friday, 25 November 2022

शोभाबाई पांचाळ मृत्यू घटना.. अमळनेर नगर पालिका मुख्याधिकारी वर कारवाई करा - "भाकप तर्फे 29 रोजी मोर्चा"

शोभाबाई पांचाळ मृत्यू घटना.. अमळनेर नगर पालिका मुख्याधिकारी वर कारवाई करा - "भाकप तर्फे 29 रोजी मोर्चा"

अमळनेर, प्रतिनिधी.. अमळनेर नगरपालिकेने सिटी सर्वे नंबर 123 फायनल प्लॉट वरील पन्नास-साठ वर्षापासूनचे रहिवासी.व्यवसायी यांना कुठल्याही नोटीसा न देता दिनांक 18 नोव्हेंबर रोजी  नगरपालिकेचे सीओ श्री सरोदे यांनी त्या ठिकाणी कार्यालयीन वेळेनंतर बुलडोजर पाठवले व त्यांचे अतिक्रमण काढू अशा धमक्या दिल्या  त्याच्या धसका खाऊन शोभाबाई रोहिदास पांचाळ यांनी जागीच प्राण सोडले घटनेला जबाबदार ते व  अतिक्रमण हटाव पथक जबाबदार आहे त्यांचे वर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा म्हणून अमळनेर तहसीलदार वर २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता  लालबावटा शेतमजूर युनियन भाकप तर्फे मोरचा काढण्यात येणार आहे 

सदर जागेवर शहरातील धनदांडगे व प्रस्थापित लोकांनी ८ कोटी रुपयांचे शॉपिंग माल उभे करणेचे  बेकायदेशीर नियोजन केले आहे. पण त्या जागेवर गेल्या पन्नाससाठ वर्षापासून रहिवासी राहत आहेत म्हणून त्यांचे कडून नगरपालिकेने २०१३ पासून मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीच बंद केली त्यांना दिवाबत्ती पाणी या हक्कापासूनही वंचित ठेवले व ते अतिक्रमित लोक आहेत असा डोंबारा पिटनेस सुरुवात केली आहे.आणि अलीकडे तुम्ही येथून निघा, म्हाडाच्या घरकुल मध्ये  जा .असा अनाहुत सल्ला सीओ देत आहेत प्रत्यक्षात ती घरे खुरड्या सारखी आहेत, या जागेवरील व्यवसायी व रहिवाशांचे जन्म मृत्यू आधार कार्ड मतदान कार्ड सर्व त्याच जागेवरचे आहेत असे असताना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना गाव कुसा बाहेर नेणे  ही कारस्थाने चालली आहेत
हे संविधान व. मानवाधिकार  नियमानुसार गुन्हा आहे.असे शेतमजूर युनियनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे व अमळनेर नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांच्या या बेकादेशीर कृत्याचा निषेध केला आहे आणि म्हणून शोभाबाई पंचाल परिवार रहिवासी व्यवसायी यांना न्याय मिळावा म्हणून अमळनेर तहसीलदार कार्यालयावर २९ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.मोर्चाचे नेतृत्व भाकप जिल्हा सचिव का लक्ष्मण शिंदे  , 

शेतमजूर युनियनचे राष्ट्रीय कमिटी सदस्य का अमृत महाजन हे  करणार आहेत मागण्या अशा..

कै. श्रीमती शोभाबाई पांचाळ यांच्या मृत्यूस जबाबदार अमळनेर नगरपालिका मुख्य अधिकारी व अतिक्रमण पथक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा फौजदारी खूनाचा गुन्हा दाखल व्हावा व नगरपालिका सीओ यांची हकालपट्टी व्हावी

कै श्रीमती पांचाळ यांचे वारस यांना नगरपालिकेत नोकरी द्यावी महाराष्ट्र शासनाने पांचाळ परिवाराला पाच लाख रुपये मदत करावी.

सिटी सर्वे नंबर 123 फायनल प्लॉटवरील व्यवसायी रहिवाशांचे तथाकथित अतिक्रमण हटाव मोहीम थांबवावी मागील पुरावे लक्षात घेता त्यांच्या जागा त्यांच्या नावाने करण्यात याव्या व घरकुल बांधून दिली व्यवसायिकांना छोटी छोटी दुकानं काढून द्यावी. 

मुख्य अधिकारी सर्वे यांच्या प्रशासक काळातील कामांची चौकशी व्हावी तरी या मोर्चा रहिवासी व व्यावसायिक हवा असलेल्या लोकांनी सहभागी व्हावे अशी आवाहन आहे आवाहन भा क प तालुका सचिव वाल्मीक मैराळे, नीलाबाई भील, उषाबाई पवार, सरफराज शाह, अमृत पाटील, कैलास पांचाळ, निर्मला शिंदे, अजय पवार, सचिन पवार, अंबर पवार, मीराबाई पांचाळ, भागाबाई पांचाळ, सुनीता नेतकर, हरीश पवार, अंकुश सोनवणे, सिताराम वडार आदींनी केले आहे

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...