Wednesday, 23 November 2022

शहापूरमधील राड्याचा पाडा येथील तरुण बिबट्याच्या झुंजित जखमी !

शहापूरमधील राड्याचा पाडा येथील तरुण बिबट्याच्या झुंजित जखमी !

भिवंडी, दिं,२३, अरुण पाटील (कोपर) :
        शहापूरचा तरुण शेतकरी जंगलातून आपल्या शेतात जात असताना अचानक बिबट्याने हमला केला असता त्याने बिबट्याशी झुंज देऊन काठीच्या सहाय्या्ने त्याला जंगलात पिटाळले व स्वतःचा जीव वाचवला.
         सदरहू घटना शहापूर तालुक्यातील विहीगावच्या कसारा वनक्षेत्रातील राड्याचा पाडा येथे मंगेश मोरे राहतो. सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास तो शेतात वरई कापणीसाठी जात होता. त्यावेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. तेव्हा त्याने न घाबरता हातातील काठीने बिबट्याचा सामना केला. त्यामुळे नरभक्षक बिबट्या जंगलात पळून गेला.
          या घटनेत मंगेश जखमी झाला. बिबट्यासोबत दोनहात केल्यामुळे तो बचावला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दोनच दिवसांपूर्वी वाशाळा वनपरिक्षेत्र हद्दीतील कोठारे गावातील वासराचा बिबट्याने फडशा पडला होता. डोळखांब येथील रानविहारच्या जंगलात किसन खाकर या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवला होता. मात्र ते यातून थोडक्यात बचावले होते. या प्रकारांमुळे परिसरातील आदिवासी शेतकरी धास्तावले आहेत.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...