म्हारळ गावातील सर्यानगरात घराचा छत कोसळून एका महिलेचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी !
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या म्हारळ गावातील सुर्यानगरात राहणा-या श्रीमती रंजना उमाजी कांबळे हिचा घराचे छत कोसळून आज पहाटे जागीच मृत्यू झाला तर मुलगी कु प्रज्ञा कांबळे ही गंभीर जखमी झाली असून तिला मुंबई सायन येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे.
तालुक्यातील म्हारळ गाव हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले गाव आहे, याच गावातील प्रभाग क्रंमाक ४ मध्ये सुर्यानगर वस्ती आहे, सुमारे २०/२५ वर्षापूर्वी येथे चाळी बांधण्यात आल्या असून त्यावर स्लँब टाकण्यात आला आहे याच चाळीत श्रीमती रंजना उमाजी कांबळे या दोन मुली व एक मुलगा याच्यासह राहत होत्या, १ वर्षापूर्वी त्यांचा पती उमाजी कांबळे यांचे निधन झाले होते, परिसरात मोलमजूरी, धुणीभांडी करुन त्या मुलीचे शिक्षण व पालनपोषण करीत होत्या.
आज पहाटे ३ ते सव्वातीनच्या सुमारास अचानक घराचा स्लँब कोसळला यामध्ये गाढ झोपेत असलेल्या रंजना (३८) यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी कु प्रज्ञा (१८) ही गंभीर जखमी झाली, सुदैवाने मुलगा राज(१६) व मोठी प्रिती(२०) हे बाजूला झोपायला गेल्याने वाचले.
या सुर्यानगर लोकवस्तीच्या जवळपासच दगड खदान असल्याने अनेकाच्या घरांना हादरे बसतात असे सांगण्यात येते, घटनास्थळी म्हारळ पोलिस चोकीचे पोलीस पोहचले आहेत, शिवाय या वार्डाचे लोकप्रतिनिधी निलेश देशमुख, विवेक गंभीरराव, किशोर वाडेकर हेही मदत कार्यात सहकार्य करत आहेत.
हे कुटूंब अंत्यत गरीब व मनमिळाऊ असल्याने त्यांच्यावर ओढवलेले नैसर्गिक संकटाने परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
No comments:
Post a Comment