Wednesday, 23 November 2022

पोलीस ठाणे विरगांव हद्यीत ०२ दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश ०२ दरोडेखोर जेरबंद !

पोलीस ठाणे विरगांव हद्यीत ०२ दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश ०२ दरोडेखोर जेरबंद !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २३ : फिर्यादी नामे भाऊसाहेब आसाराम गायकवाड वय ३७ वर्ष व्यवसाय शेती रा हमरापुर शिवार ता. वैजापुर जि. औरंगाबाद यांनी दिनांक ०२/११/२०२२ रोजी पोलीस ठाणे बिरगांव येथे फिर्याद दिली की, दिनांक ०२/११/२०२२ रोजी ०१:०० वा. च्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या घरात झोपलेले असतांना ०६ अनोळखी चोरटयांनी फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडून कोयता, चाकू, गज, लाकडी काठया व कुन्हाडीचा दांडा या हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या देवून फिर्यादीचे वडील, भाऊ, आई यांना मारहाण व जखमी करुन तसेच फिर्यादीचे घराशेजारी कमलाबाई वाघ यांचेही घरात घुसून त्यांना वरिल हत्यारांचा धाक दाखवून बळजबरीने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण १,३४,३००/- रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला आहे, त्यावरुन पोलीस ठाणे विरगांव येथे गुरनं २५० / २०२२ कलम ३९५ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

तसेच फिर्यादी नामे शेषराव माधव चौधरी वय ४१ वर्ष व्यवसाय शेती रा हमरापुर शिवार ता. वैजापुर जि. औरंगाबाद यांनी दिनांक ०२/११/२०२२ रोजी पोलीस ठाणे विरगांव येथे फिर्याद दिली की, दिनांक ०२/११/२०२२ रोजी ०२:३० वा. च्या दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या घरात झोपलेले असतांना ०७ अनोळखी चोरटयांनी फिर्यादीचे घराचा दरवाजा तोडून कोयता, चाकू, गज, लाकडी काठया व कुहाडीचा दांडा या हत्याराचा धाक दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या देवुन बळजबरीने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४४,३००/- रुपये किमतीचा ऐवज बळजबरीने चोरुन नेला आहे, त्यावरुन पोलीस ठाणे विरगांव येथे गुरनं २५१ / २०२२ कलम ३९५ भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर दोन्ही गुन्हयांचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असतांना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक व तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरच्या गुन्हयातील निष्पन्न आरोपी नामे तेज्या गोरख काळे रा. हनतगांव चिखली ता. आष्टी जि. बीड हा सदर गुन्हयांत दिनांक • ०९/११/२०२२ रोजी निष्पन्न झाल्याने व सदर गुन्हयात त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले असता त्याने सदर गुन्हयाची कबुली देऊन गुन्हा करतांनी माझ्या सोबत साथीदार नामे (१) संतोष डिस्चार्ज उर्फ सुर्यभान काळे रा. अंतापुर गायरान ता. गंगापुर जि. औरंगाबाद (२) रवि उर्फ रविंद्र मुबारक भोसले रा. अंतापुर गायरान ता. गंगापुर जि. औरंगाबाद व इतर चार साथीदारांनी मिळून सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिलेली असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीतांचा गंगापुर हवीत शोध घेत असतांना सदर गुन्हयांतील निष्पन्न आरोपी (१) संतोष डिस्चार्ज उर्फ सुर्यभान काळे रा. अंतापुर गावरान ता. गंगापुर जि. औरंगाबाद (२) रवि उर्फ रविंद्र मुबारक भोसले रा. अंतापुर गायरान ता. गंगापुर जि. औरंगाबाद हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी देखील वरिल प्रमाणे गुन्हयाची कबुली दिल्याने नमुद आरोपींना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे विरगांव यांच्या ताब्यात देण्यांत आले असुन पुढील तपास पोलीस ठाणे विरगांव हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, श्री मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, सहा. पोलीस अधीक्षक श्रीमती महक स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोउपनि विजय जाधव, पोहेकॉ श्रीमंत भालेराव, नामदेव शिरसाठ, संतोष पाटील, पोना वाल्मीक निकम, विजय धुमाळ, उमेश बकले, पोकों रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, राहूल गायकवाड, योगेश तरमाळे, जिवन घोलप यांनी केली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...