Wednesday, 23 November 2022

किरण गायकर यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या खाजगी अनुदानित शाळा विभागाच्या पालघर जिल्हाप्रमुख पदी निवड !

किरण गायकर यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या खाजगी अनुदानित शाळा विभागाच्या पालघर जिल्हाप्रमुख पदी निवड !


पालघर, दि.२३ (ऑनलाईन प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे वसई तालुकाध्यक्ष किरण गायकर यांची संघटनेच्या खाजगी अनुदानित शाळा विभागाच्या पालघर जिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. तसेच वसई तालुक्यातील महिला पेन्शन फायटर उत्तरा जाधव यांची पालघर जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात आली.
     पालघर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद शाळांबरोबरच खाजगी अनुदानित (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शाळांची संख्याही मोठी आहे. शिवाय या शाळांचे प्रश्न हे जिल्हा परिषद शाळांपेक्षा वेगळे आहेत. पालघर जिल्ह्याची निर्मिती होऊनही खाजगी अनुदानित शाळांचा बराचसा कारभार आजही ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत पाहिला जातो. त्यामुळे ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष व नूतन राज्य प्रतिनिधी नितीन तिडोळे यांनी ही बाब नवनियुक्त पालघर जिल्हा कार्यकारणीच्या लक्षात आणून देऊन संघटनेत खाजगी अनुदानित शाळा विभागासाठी स्वतंत्र पदाची निर्मिती करावी अशी मागणी नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीकडे केली. पालघर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांतील डीसीपीएस / एनपीएस धारकांची मोठी संख्या लक्षात घेता जास्तीत जास्त डीसीपीएस / एनपीएस धारक कर्मचारी जुनी पेन्शन संघटनेला जोडले जावेत यासाठी खाजगी अनुदानित शाळा विभागासाठी स्वतंत्र जिल्हाप्रमुख पद निर्माण करण्यास जिल्हा कार्यकारिणीने मान्यता दिली व त्यानुसार खाजगी अनुदानित शाळा विभागाच्या पालघर जिल्हाप्रमुख पदी किरण गायकर यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेला वसई तालुक्यात विशेष ओळख करून देण्यात किरण गायकर यांचा मोठा वाटा आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...