Thursday, 24 November 2022

छात्र सैनिकांच्या २२०० कि.मी. मेगा सायकलिंग मोहिम "महापरिक्रमा" ला महापौरांनी हिरवी झेंडी दाखवून केला प्रारंभ !

छात्र सैनिकांच्या २२०० कि.मी. मेगा सायकलिंग मोहिम
"महापरिक्रमा" ला महापौरांनी हिरवी झेंडी दाखवून केला प्रारंभ !

जळगाव, अखलाख देशमुख, दि २४  :  “राष्ट्रीय छात्र सेना स्थापना आणि आझादी का अमृत महोत्सवाच्या ७५ व्या गौरवशाली वर्षांच्या स्मरणार्थ" १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन जळगाव व ग्रुप मुख्यालय, अमरावती यांच्या नेतृत्वाखाली "महापरिक्रमा" नावाची मेगा सायकलिंग मोहीम राबवत आहे. या मोहिमेचा आज गुरुवार, दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी शहरातील १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.च्या संचालिका व जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी हिरवी झेंडी दाखवून जळगाव येथून प्रारंभ करण्यात आला. यावेळी बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ.सौ.गौरी राणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या उभारणीत तरुणांचे योगदान सर्वोत्तम आहे. या तारुण्यात चारित्र्य, साहस, नेतृत्वास आकार देण्यासाठी आणि शारीरिक सहनशक्ती विकसित करण्यासाठी महाराष्ट्र एन.सी.सी डायरेक्टरेट च्या विशेष प्रोत्साहनाने ही सायकल मोहीम देशातील तरुणांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सायकलिंग मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे. यात छात्र सैनिक सुमारे २२०० किलोमीटरचे अंतर पार करतील. यात विशेष म्हणजे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असलेली बाब म्हणजे चुकीची माहिती समाजात पसरवण्यापासून रोकण्यासाठी  (Against Disinformation) छात्रसैनिक या मोहिमेत प्रत्येक शहरात, महाविद्यालयात, शाळांमध्ये या विषयावर पथनाट्य सादर करून जनजागृती देखील करणार आहेत. छात्र सैनिकांच्या या साहसाबरोबर राष्ट्रीय सुरक्षेची भावना समाजास प्रेरणा देणारी ठरणार आहे.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्र सैनिक महाराष्ट्र परिक्रमा सायकल मोहिमेत १८ महाराष्ट्र बटालिअनचे छात्र सैनिक राज्यभर सायकल चालवणार आहेत. अमरावती ग्रुपचे प्रमुख ब्रिगेडियर शंतनू मयंकर या मोहिमेचे संपूर्ण नियंत्रक म्हणून असतील. ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअनचे समादेशक अधिकारी कर्नल सी. पी. भाडोला या मोहिमेचे अधिकृत नेतृत्व करतील. तर १८ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालिअन, जळगाव चे लेफ्ट. कर्नल पवन कुमार, प्रशाकीय अधिकारी हे देखील मोहिमेत विशेष आयोजक म्हणून योगदान देत आहेत.

राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक (सिनिअर डिव्हीजन) दि. २४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर २०२२ दरम्यान जळगाव येथून सुरुवात करतील. यात अमरावती, नागपूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि शेवटी पुणे असा हा प्रवास असणार असून महाराष्ट्रातील एन.सी.सी च्या सर्व विभागीय कार्यालयांना भेट देऊन महाराष्ट्रभर सायकलीद्वारे परिक्रमा करणार आहेत.

मूळजी जेठा महाविद्यालयाचे ४,  एन.एम. कॉलेज चे ३, बाहेती कॉलेजे चे २ तर अकोला येथील १  छात्र सैनिक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन (डॉ.) योगेश बोरसे, लेफ्ट. गौतम भालेराव, लेफ्ट. शिवराज पाटील यात मोहिमेत योगदान देणार आहेत. तसेच बटालिअन चे बी.एच.एम. तात्या काकलीज हे सोबत असणार आहेत. मोहिमेसाठी १८ महाराष्ट्र बटालिअनचे बॅक अप वाहन कॅंटर असणार आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...