Saturday, 22 April 2023

संत गजानन महाराजांच्या भक्तांसांठी आनंदाची बातमी, आनंद सागर पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार !

संत गजानन महाराजांच्या भक्तांसांठी आनंदाची बातमी, आनंद सागर पर्यटकांच्या सेवेत रुजू होणार !

शेगांव, अखलाख देशमुख, दि २३ : संत गजानन महाराज संस्थानकडून उभारण्यात आलेले आनंद सागर अनेक वर्षापासून बंद आहे. आनंद सागर सुरू होण्याची देशभरातील पर्यटक वाट पाहत आहेत. २००१ साली धार्मिक,आध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून आनंद सागरची २०० एकर जमिनीवर निर्मिती करण्यात आली आहे.

आनंद सागरमुळे शेगाव शहर जगाच्या नकाशावर आले. यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळाली पण काही कारणास्तव शेगाव संस्थानने आनंद सागर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. अजूनही आनंद सागर बंद आहे. आनंद सागर सुरू होणार असल्याचे काही फोटो व्हायरल होत आहेत. मात्र याबाबत श्री गजानन महाराज संस्थानच्या अधिकृत माहिती नुसार आनंद सागर पुढील महिन्यात सुरु होऊ शकते त्यासाठी आनंद सागर मध्ये स्वछतेचि तयारी जोरात चालु आहे. 

आनंद सागर पाहण्यासाठी भाविक देशभरातून येतात. आनंद सागरमुळे शेगाव शहराला मोठ नावलौकीक मिळाले आहे. त्यामुळे पर्यटकांची येथे मांदियाळी असते.आनंद सागर हे उद्यान व ध्यान केंद्र आहे. आनंद सागर श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्टतर्फे भक्तांसाठी आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित केलेले आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी सुविधा आहेत. मत्यालय, तलाव, धान्यकेंद्र, फाऊंटन रेल्वेगाडी, झुलता पूल, तसेच तिथे ध्यान मंदिर आहे.

आनंद सागर पुन्हा सुरू करावे अशी मागणी सतत भाविकांकडुन होत होती. पर्यटक आनंद सागर सुरू होण्याची वाट पाहत आहेत. आनंद सागर कधी सुरू होणार, असा प्रश्न देशभरातील भाविक विचारत आहेत. तेव्हा लवकरच येणाऱ्या महिन्यात आनंद सागर सर्वासाठी खुलं असेल. हा श्री संत गजानन महाराजांचा कृपा आशीर्वादच आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...