Wednesday, 9 August 2023

रेती उपगटाचा जाहिर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रियेस 12 ऑगस्ट पर्यंत प्रथम मुदतवाढ !!

रेती उपगटाचा जाहिर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रियेस 12 ऑगस्ट पर्यंत प्रथम मुदतवाढ !!

रायगड, दि.8 :- सन 2023-2024 साठी रायगड जिल्ह्यातील सावित्री नदी-बाणकोट खाडी (केंबुर्ली ते राजेवाडी) कुंडलिका नदी/रेवदंडा खाडी व सावित्री नदी/बाणकोट खाडी तसेच पाताळगंगा नदी, धरमतर खाडी, रेवदंडा खाडी, राजपूर खाडी व बाणकोट खाडी या खाडीपात्रामधील ड्रेजरद्वारे उत्खननासाठी राखीव असलेल्या रेती उपगटाचा जाहिर लिलाव ई-निविदेच्या प्रक्रिया दिनांक 28/06/2023 ते 05/08/2023 या कालावधीसाठी राबविण्यांत आली होती. त्यापैकी प्ररिशिष्ट 1 मधील डेपो क्रमांक 2, 8 व 9 करिता प्रत्येकी तीन निविदा प्राप्त झाल्याने ते वगळून शिल्लक असलेल्या वाळू डेपो क्रमांक 1, 3, 4, 5, 6, 7 हे फेर निविदेसाठी प्रथम मुदतवाढ देण्यात येते आहे.
या फेर निविदा प्रक्रियेस दि.05 ऑगस्ट ते दि.12 ऑगस्ट  या कालावधीसाठी प्रथम मुदतवाढ देण्यांत येत आहे. या लिलावाच्या प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती, गटांचा- डेपोचा तपशिल, आणि गाळ अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती माहिती https://mahatenders.gov.xn--in-2nf3b9fyd/ www.raigad.gov.in या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !!

कल्याण डोंबिवलीच्या विकासकामांचा महापालिकेत सविस्तर आढावा : महापौर व आयुक्तांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक !! *कल्याण, दि. 13...